पान:आरोग्यविज्ञान.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१ हवा शीतल व शुद्ध राहाते. पण शहरांत घराशीं घर लागलेलें असतें व झाडें कमी असतात, आणि मुंबईसारख्या शहरांत तर जागेला इतकी किंमत असते कीं झाडांची किंमत न जाणतां त्यांना एक- दम रजा देण्यांत येते, म्हणून हवा पाहिजे तितकी शुद्ध राहात नाहीं. शिवाय हवेच्या दृष्टीनें पहातां दर माणशी सरासरी एक "हजार घनफूट जागा पाहिजे. इतकी जागा न मिळाल्यास हवा अशुद्ध व निःसत्त्व होते, व रक्तशुद्धि हवेवर अवलंबून असल्या- कारणानें, रक्त अशा हवेंत अशुद्धच राहातें, व मनुष्य रोगट व निस्तेज बनत जातो. कॅर्बानिक अॅसिड हा वायु हवेपेक्षां जड आहे. वारा नसेल तर जमिनीजवळच त्याचा विषारी थर बनण्याचा संभव असतो. तेव्हां जागा कोंदट व माणसें पुष्कळ ह्या दोन्ही गोष्टी जमल्यावर तेथील हवा अगदीं ख़राब व विषारी बनल्या- शिवाय कशी राहील ? शहरांत अशा जागा फार. तेव्हां शहरां तील लोकांनीं ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष्य देणें अगत्याचें आहे. आंत घेतलेल्या श्वासापेक्षां उच्छासाची हवा जास्त उष्ण असते. उष्णतेमुळे ती जास्त हलकी होते व वर चढते. ही विषारी हवा बाहेर जाण्याची व स्वच्छ हवा आंत येण्याची सोय राहत्या जागेंत चांगली आहे कीं नाहीं हें प्रत्येकानें पाहिलें पाहिजे. अर्थात् खिडक्या दरवाजे बंद केले तरी हवा खेळावी म्हणून त्यांच्या वरच्या बाजूस भिंतींत सोय केलेली असली व अशी सोय असणें अवश्य आहे- तर तेथें कागद चिकटवून बंदोबस्त करणें म्हणजे शुद्ध वेडेपणा होय. दिवसापेक्षां रात्रीं हवा जास्त अशुद्ध होत असते. कारण