पान:आरोग्यविज्ञान.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० भाग २. हवा. पृथ्वीभोंवतीं पुष्कळ मैल जाडीचें हवेचं आवरण आहे. हवा दिसत नाहीं पण ती चलन पावली म्हणजे वाऱ्याच्या रूपानें तिचें अस्तित्व आपल्यास समजतें. हवा हैं ऑक्सिजन, कॅर्बोनिक अॅसिड, पाण्याची वाफ, नायट्रोजन, व आणखी कांहीं वायूंचे मिश्रण आहे. अशुद्ध रक्त शुद्ध करण्यास फुप्फुसांना ऑक्सिजनची जरूर असते. ऑक्सिजनची तीव्रता कमी करण्याचे काम नायट्रोजन करितो. आपण उच्छ्वास सोडतों त्यांतील बराच भाग कर्बोनिक अॅसिड व पाण्याची वाफ यांचा असतो. ठोकळ मानानें दर पांच भाग हवेंत एक भाग ऑक्सिजन व चार भाग नायट्रोजन असतो. मोकळ्या हवेंत कर्बोनिक अॅसिडाचें प्रमाण फार थोडें, म्हणजे तेरा रुपयांत एक पै, इतकेंच असतें. पण तो वायु फार विषारी आहे. आपण उच्छ्वासानें हवा सतत दूषित करीत असतों असा ह्याचा अर्थ झाला. हा हवेंतील सततचा दोष काढून टाकण्याकरितां सृष्टिदेवतेनें छानदार युक्ति योजिली आहे. ती अशी : - झाडांच्या अंगीं अशी शक्ति ठेविली आहे कीं सूर्यप्रकाशांत झाडांची पानें हवेंतील कॅब- निक अॅसिड वायु शोषून घेऊन त्याचें पृथक्करण करतात व त्यांतील कार्बनचा स्वतःच्या पोषणाकडे उपयोग करून ऑक्सिजन हवेंत सोडून देतात. हें काम फक्त सूर्यप्रकाशांतच होतें. ह्यावरून आपण हवा दूषित करीत असतों व झाडें ती शुद्ध करीत असतात असें झालें. कांहीं खेडेगांवांत प्रत्येक घराभोवती झाडें असतात त्यामुळे