पान:आरोग्यविज्ञान.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९ ळ्यांतून मार्ग आक्रमित असतां अन्नाला पित्तादिक नाना तऱ्हेचे रस येऊन मिळतात, जवळून जाणाऱ्या रक्तवाहिन्यांचा उपयोग होतो, व अनेक रासायनिक क्रिया होऊन अन्नांतील सर्व उपयुक्त पदार्थांचें रूपांतर होऊन एक पोषक रस तयार होतो. ह्या रसाचा कांहीं भाग रक्तवाहिन्यांत शोषला जाऊन रक्तप्रसारांत लगेच सामील होतो, व कांहीं भाग प्रथम रक्ताशयाकडे जाऊन नंतर प्रसार पावतो. अशा रीतीनें जुन्या रक्ताची नवीन रक्त बनण्यास मदत होते, व नवीन रक्तानें जुन्यांतील खर्ची पडलेल्या द्रव्यांची जागा भरून निघते. एंजिनाला जसा बॉयलर तशीं आपल्या शरीराला पचनेंद्रियें होत. असो. अन्नांतील सर्व माणें रक्त बनल्यावर राहिलेला गाळसाळ बाहेर पडतो. उपयुक्त पदार्थांचें ह्याप्र- आंतड्यांतून मलद्वारा असें हें थोडक्यांत शरीरवर्णन झालें. ह्यावरून ध्यानांत आलें असेलच कीं, ज्ञानतंतूंच्या द्वारा मेंदूचा, व रक्तवाहिन्यांच्या योगें रक्ताशयाचा, अंमल सर्व शरीरभर जारीनें चालू असतो. हें शरीररूपी अजब यंत्र आपल्या चलनाला लागणारी रक्तरूपी सामुग्री खतः तयार करून घेतें, आपल्यांतील झीज भरून घेतें, आपल्यांतील घाण उच्छासाच्या, घामाच्या अगर मलमूत्राच्या रूपाने बाहेर काढून लावतें, व अशा रीतीनें आपलें काम सुरळी- तपणे चालविण्याची व आपले आयुष्य पुष्कळ वाढविण्याची शक्य ती खटपट करीत असतें. तर मानवी कल्पनेला अतर्क्स असें हें यंत्र करणाऱ्या परमेश्वराचे आभार मानून हैं शरीरकार्य समजून घेऊन त्याला मदत करणें, हें आपलें शरीरासंबंधानें कर्तव्यच होय.