पान:आरोग्यविज्ञान.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ बरोबर दंडांतील स्नायु आकुंचन पावलेला, व ह्मणूनच लठ्ठ झालेला, दृष्टीस पडतो. शरीरांतील सर्व स्नायु मजबूद असले ह्मणजे शरीरा- चा आकार चित्रांत दाखविल्याप्रमाणें पीळदार व फारच मनोहर दिसतो. ज्ञानतंतु. सैन्याला जसा सेनापती तसा शरीराला मेंदू होय. मेंदू हा एक पांढऱ्या करड्या रंगाचा मऊ पदार्थ असून मजबूत हाडांच्या पेटीमध्ये तो डोक्यांत सांठविलेला असतो. त्याचाच एक निमुळता भाग पाठीच्या कण्यांतून ओंवलेला आहे. पांढरे दोरे असतात. त्यांचे प्रकार दोनः ज्ञानतंतु हे बारीक शरीराच्या सर्व भागांतील बातमी मेंदूकडे आणून पोंचविणारे पहिले, व मेंदूचा हुकूम घेऊन स्नायूंकडून त्याची अंमलबजावणी करणारे दुसरे. आपल्या आंगावर कोठें माशी बसली म्हणजे पहिल्या प्रकारचे ज्ञानतंतु ही बातमी मेंदूकडे नेऊन पोंचवितात. लगेच माशी हांकलून लावण्याचा हुकूम दुसऱ्या प्रकारचे ज्ञानतंतु मेंदूकडून त्या भागाच्या स्नायूंकडे आणून पोंचवितात, व माशी हाकलून लावण्यांत येते. हें सर्व कल्पना होणार नाहीं इतक्या थोड्या वेळांत होतें हें आपण पहातोंच. आपल्या देशांत हल्लीं बरेच ठिकाणीं तारांचें जाळे दृष्टीस पडतें, त्याच्या योगानें एखाद्या क्षुल्लक ठिकाणाची देखील बातमी फार त्वरित जिल्ह्याच्या अगर इलाख्याच्या मुख्य ठिकाणीं पाठवितां येते, व जरूर तर तेथून तारेनेंच हुकूमही सोडण्यांत येतात. त्याचप्रमाणें ज्ञानतंतु मेंदू-