पान:आरोग्यविज्ञान.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ पासून अगर कण्यापासून निघून सर्व शरीरभर जाळ्यासारखे पसरलेले असतात, व इकडून तिकडे बातम्या व हुकूम पोंचवि- ण्याचें काम करितात. रक्ताशय, फुप्फुसें व पचनेंद्रियें ह्यांच्या स्नायूंना आपआपले काम करण्याची कायमची ताकीद आहे. बाकीचे स्नायु हुकुमाची वाट पहात असतात. रक्त व त्याचें अभिसरण. शरीरांतील प्रत्येक भागाचें पोषण रक्तावर अवलंबून असतें. शुद्ध व सकस रक्ताचा सतत पुरवठा झाल्याखेरीज कोणत्याही इंद्रियाची नीट वाढ अगर त्याचें नीट काम होणार नाहीं. ज्ञानतंतूंप्रमाणेंच रक्तवाहिन्या सर्व शरीरभर पसरलेल्या आहेत. त्या दोन प्रकारच्या आहेत. शुद्ध रक्तवाहिन्या अगर धमन्या व अशुद्ध रक्तवाहिन्या अगर शिरा. ( पुढील पानावरील चित्र पहा ). त्याच्या एका भागांतून नांवाच्या वायूचा त्याला प्रथम मोठ्या व नंतर रक्ताशयाला आपण हृदय ह्मणतों. शुद्ध रक्त निघतें. हवेतील ऑक्सिजन फुप्फुसें पुरवठा करितात. तेथून निघून सूक्ष्म नलिकांतून तें शरिराच्या सर्व भागांत प्रवास करितें. ( आकृति पहा.) वाटेंत प्रत्येक भागाचा दोष ऑक्सिजनच्या साहाय्यानें काढून टाकून त्या भागाला जरूर तीं पोषकद्रव्यें तें देतें. अशा तऱ्हेनें अशुद्ध व निकस झालेलें रक्त वरील सूक्ष्म नलिकांनाच जोडलेल्या निराळ्या व जरा मोठ्या नलिकांनी रक्ताशयाच्या दुसन्या भागांत परत येतें. तेथून फुप्फुसांकडे जाऊन शुद्ध होऊन व ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा बरोबर घेऊन रक्ताशयाच्या पहिल्या