पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जीवन मुख्य प्रवाहापासून अलग पडलेले आहे. आदिवासीं सुधारलेल्या जगापासून शेकडो मैल दूर दुर्गम डोंगराळ भागात राहतात. त्यामुळे त्यांचा एक समूह बनतो. आणि ते विशिष्ट एक बोली वापरीत असतात, आदिवासींमध्ये लिखित वाडमयाची. परंपरा नाही. त्यांच्या बोलीतील दुराव्याचे तेही एक कारण सांगता येईल. आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनात आर्थिक, सामाजिक, मानसिक व सांस्कृतिक कुचंबणाच आहे असे दिसते.

निसर्गपुत्राचे जीवनमान सुधारले आहे :

 सेवाभावी संस्थांच्या व शासनाच्या मदतीमुळे त्यांना आता शिक्षण शक्य होत आहे. काही प्रमाणात त्यांचा आहार, राहणीमान, आरोग्य सुधारते आहे.. आदिवासींमधील शिकण्यासाठी धडपडणारी मुले आपल्याला दिसू लागलेली आहेत.

 “मडक्यात / कणगीत दाणा तर भिल्ल उताणा” ही म्हण असे सुचविते, की या समाजाला थोडेसे जरी खायला असले तरी पुरे झाले. आजचे भागले की झाले उद्याची चिंता नाही. आदिवासींच्या गरजा कमालीच्या मर्यादित असतात याचा प्रत्यय “ते फडका घे, सुडका घे सूट". या म्हणीतून येतो. एक फडके असले की त्याचे जीवन सुरू होते. भामरागडचा निसर्गपुत्र माडिया या अनुसूचित जमातीबद्दल डॉ. श्रीकांत जिचकार यांनी नमूद केले आहे की माड़िया लोकांनी अद्याप बीज पाहिलेली नाही. एसटीची बस पाहिलेलीही नाही. केळे सोलून खाणे त्यांना माहित नाही. पालाची वस्त्रे ते परिधान करतात. थोड्या फार फरकाने अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील इतर आदिवासींची आढळते.

सुखसोयींमधील असमानता :

 तात्पर्य त्यांचे नित्याचे जीवन आणि त्यांना घ्यावयाचे शिक्षण यांच्यात कोठेही सुसंवाद आढळत नाहीत. त्यामुळेच आदिवासी विद्यार्थी शिक्षणाचा कंटाळा करतो. नागरी किंवा शहरी विद्यार्थी व आदिवासी विद्यार्थी यांना एकाच मापाने मोजणे ही आदिवासी विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडणारा अन्याय आहे. ते असमान परिस्थितीत असतात. सुविधा असमान असतात. तरीही त्यांना एकाच मापाने

९५