कसे मोजले जाते. हा खरा प्रश्न आहे. शहरी नागरी जीवन कोठे आणि ग्रामीण
आदिवासी जीवन कोठे ? यात महदंतर आहे. स्थळकाळ परिस्थितीचा संदर्भ सोडून
आपल्याला विचार करता येणार नाही.
भारतात सहा कोटी आदिवासी आहेत. त्यातील महाराष्ट्रात सत्तावन्न लाख
आहेत. तेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या आदिवासींपर्यंत आपण जाऊन
पोहचणार कधी असा प्रश्न मनात येतो. आदिवासींमध्ये आपण केवळ आदिवासी
विद्यार्थी शब्द वापरत असलो तरी त्यात विविध उपजाती आहेत. नुसत्या ठाणे
जिल्ह्याचा विचार केला तरी त्यात त्यांची संख्या आठ आढळते. महादेव कोळी,
मल्हार कोळी, ढोर कोळी, कोकणा, वारली, ठाकूर, धोडी, कातकरी त्यातही,
पुन्हा क ठाकूर, म. ठाकूर दुबळा असे उपप्रकार आहेत. महादेव कोळी, कोकणा
या जाती अग्रेसर असून, कातकरी सारखा समाज पूर्णतः मागे राहिलेला आहे.
तशात पारधी, भिल्ल गोंड, माडिया या जमाती अद्यापही शिक्षण संस्कारापासून
दूर आहेत. पार्धी एकलव्य यासारखी विरळ नियतकालिके सुचिन्ह मानायला
हरकत नाही. बहुसंख्य आदिवासी विद्यार्थी थोड्याफार फरकाने भरडले जात आहेत.
त्यांच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. कमवणाच्यापेक्षा खाणान्यांची संख्या
अधिक आहे. आदिवासींचे कुटुंब विस्कळीत व मोठे असते. मागच्या पिढीत प्रौढ
शिक्षण फार तर प्राथमिक शिक्षणापर्यंतच ही कुटुंम्बे पोहचलेली आहेत.
आदिवासी जीवनात शेती महत्त्वाची. त्यातही जाळल्या शिवाय ती पिकत नाही. असा सीता माईचा शाप आहे. आणि नांगरायची प्रथा नाही. कारण भूमातेच्या हृदयाला जखमा होतात अशी त्यांची समजूत आहे. शेतीमुळेच आदिवासी पाड्यात गुरफटून बसला आहे. त्यामुळे धड ना शिक्षण मिळते. पण या आशेत गुरफटून तो राहतो. शेती कदाचित सोडली तर बुडेल म्हणून तेथे राहून त्याने स्वतःला दारूत बुडविले आहे. मुलांची शेती काम, मजुरी, पोरवाडा सांभाळणे, गुरे राखणे ही नित्याची कामे होऊन बसली आहेत. शाळा दाराशी आली तरी पोर गुराशी, अशा परिस्थितीमुळे हेच टिकेल असे दिसते. पाच परिस्थितीचा परिपाक म्हणजे थोडं फार शिकलेल्यांना, लगेच नोकरीत अडकून पडावे लागते. समाजाच्या स्वतःच्या, अन्य आप्तांच्या शिक्षणासाठी काही करण्याचे