Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रादेशिक भाषामाध्यम खुले असावे :

 वनवासींच्या विकासासाठी त्या त्या प्रदेशातील भाषा प्रांतिक भाषामाध्यम सर्वत्र खुले असावे. म्हणजे उच्च शिक्षणाची आणि माहिती व तंत्रज्ञानाची कवाडे वनवासींच्या विकासासाठी खुली होतील आज इंग्रजीचा अट्टाहासाने होत असलेला अनाठायी वापर वनवासींच्या विकासात फार मोठा अडसर झालेला आहे. तळागाळातील माणसांच्या विकासात माध्यमभाषा आड येता उपयोगाची नाही. बनवासींच्या प्रवेशाच्या राखील जागा स्पष्टपणे नमूद केलेल्या नसतात. त्या जाहीर करून वेळोवेळी अद्यावत केल्या पाहिजेत, बनवासींमध्येही अतिमागास कातकरी, ढोरकोळी सारख्या जमातींकडे विशेष लक्ष पुरविण्याची गरज आहे. त्याप्रमाणे पूर्वप्रभावाने बनवासींच्या नोकरी सेवा योजनेतील ज्येष्ठता, नव्याने वाढविलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार दिली जावी. आजच्या व्यवस्थेत तशी सोय नाही. शिवाय नोकरी, सेवा योजनेतील जिल्हा मर्यादा त्यासाठी ठेवू नये. म्हणजे आदिवासी राज्य व देश पातळीवर पुढे येऊ शकेल.

(महाराष्ट्रातील आदिवासी महिला खेळाडू मलखम्भ प्रदर्शन करतांना)

वनवासी क्रीडा क्षेत्रातही आघाडीवर :

 निसर्गाशी सुसंवाद जन्मतःच साधून उन, पाऊस, वारा, थंडी पचविण्याचे सामर्थ्य वनबासींमध्ये उपजत आहे. त्याचा योग्य मार्गदर्शनाने, सरावाने विकास करता येईल, पारंपारिक मल्लखांब विद्या, मॅरेथॉन शर्यती, व्यक्तिगत खेळ

(अॅथलेटिक्स) यात बनवासी निश्चितच पुढे जाईल, क्रीडा कसोटीवर उतरलेल्या

९२