पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि त्यांच्या विविध बोलींचा अभ्यास भाषा आणि संस्कृतीच्या अंगाने अभिप्रेत आहे.

 निर्मिती, दैनंदिन आचार, जीवनमान, राहणीमान आणि परंपरा इत्यादींच्या अनुषंगाने हा अभ्यास होऊ शकेल. त्यामुळे संस्कृतीचा उलगडा होईल. त्यांतील भारतीयत्वाच्या संकल्पना स्पष्ट होतील. त्यादृष्टीने या वनवासींना अवगत असलेली लोकविद्या खचितच उद्बोधक आहे.. बनवासींची चित्रकला विशेष बोलकी आणि जिवंत आहे. वनवासींचे कलादालन समृध्द आहे. ते स्वतंत्र लोकमंच निर्माण करू शकतील. विविध ललित कला- उदा. संगीत, चित्र, शिल्प, नृत्य, इत्यादींमधून वनवासी भारतीय संकल्पना विविध रुपात साकार करीत आहेत. त्या जाणून घेण्याची आवश्यकता आहे. नुसते वनवासींचे थाळगान अभ्यासले तरी त्यात विविध पौराणिक कथा कौशल्याने या समाजाने गुंफलेल्या आढळतात तारपा नृत्यातील तारपा इतर वेळी ते देव्हाऱ्यात ठेवून त्याची पूजा बांधतात. बोहाडा हा विविध देवदेवतांची नृत्ये सादर करतो, पण त्याबरोबरच मानीत असलेली विविध सोंगेही तो प्राचीन परंपरेने चालत आलेली. वठवितो. वनवासी काज म्हणजे. जणू सामुदायिक श्राध्दविधी करतात त्यात कुटुंबाच्या पुनर्वसनाची कल्पना अनुस्यूत आहे.

 वनवासींच्या ठायी असलेली प्रतिभा, प्रज्ञा आणि प्रसंगी विज्ञाननिष्ठा त्यात निसर्गप्रेम, पर्यावरण रक्षणाचे भान समाविष्ट आहे हे सारे यातून स्पष्ट होते. वनवासींची हजारो वर्षांची सांस्कृतिक मूल्य परंपरा या कला संस्कृती अभ्यासातून जतन केलेली दिसून येईल.

 वनवासी हीच संज्ञा सर्वार्थाने योग्य आहे. कारण 'ॲब ओरिजनल' या इंग्रजी कल्पनेतल्या शब्दांचे आपल्याकडे आदिवासी हे भाषांतर केले, हा अनुचित ‘आदिवासी' शब्द कालवाचक आहे. त्यातून जमात सूचित होत नाही. या शब्दाला चिकटलेले मागासलेपण आणि त्याच्या वापरातून अकारण दुजाभाव वाढविण्यापेक्षा वनवासी संबोधणे श्रेयस्कर आहे. त्यामध्ये भारतीय संस्कृतीतले

सामावलेपण आहे.

९१