आहेत, त्यांची गरज आज संपूर्ण समाजालाच भासत आहे. चारित्र्यवान,
सुसंस्कारित, सुशिक्षित, परोपकारी पिढी घडविणे म्हणजे आदिवासींचा खरा
विकास आहे. केवळ आर्थिक वा भौतिकदृष्ट्या विकास करणे, उद्योजकता वाढविणे
येथे पुरेसे ठरणार नाही. अन्यथा अमेरिकेतील दोन विद्यार्थ्यांनी २५ विद्यार्थी व
शिक्षक ठार केले याचे जगात यापुढील काळात आश्चर्यच वाटणार नाही. अशी
गुन्हेगारीची प्रवृत्ती दृश्य माध्यमांनी निर्माण करून ठेवली आहे. सुदैवाने
आदिवासींना अद्याप याचा वाराही लागलेला नाही.
भारतीय संकल्पनेतील वनवासी विकासासाठी दिशा :
वनवासींच्या भावी काळातील विकासाची दिशा निश्चित करतांना पुढील
उपक्रम आणि प्रकल्प परिश्रमपूर्वक राबविल्यास त्यांच्या हिताचे ठरणार आहे.
त्यादृष्टीने काही प्रकल्प व उपक्रम सुचविता येतील.
वनवासी जीवनाच्या समृध्दीचे प्रतीक वनवासी कला आणि साहित्य निर्विवाद
आहेत. वनवासींच्या दमदार आणि कसदार कला, साहित्य आणि संस्कृतीने
बनवासींना आपली तहानभूक विसरून बेहोशीयुक्त, धुंद, आणि आनंदी जीवन
जगायला शिकविले आहे. वनवासी लोकसाहित्य आणि विविध कलांमध्ये त्यांच्या
भावना, संस्कृती आणि विचारही ग्रथित झालेले आहेत. त्यासाठी नवोदित आणि
नवशिक्षित आदिवासी साहित्यिकांना उत्तेजन देणारे व्यासपीठ निर्माण केले
पाहिजे. बनवासी लेखक मेळावे जिल्हावार भरवावेत. त्यात ठाणे, नाशिक, धुळे,
अमरावती, नगर, नागपूर, भँडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड या जिल्ह्यांचा
म्हणजे वनवासीपट्ट्याचा समावेश असावा, लेखक लिहू लागले की त्यांची संस्कृती
व्यक्त होईल. आवश्यकता भासल्यास वनवासी लेखकांसाठी खास लेखनशिबिरे
आयोजित करण्यात येतील. त्याचप्रमाणे त्यांच्या लेखनाची प्रकाशने खास तरतूद
करुन करण्यात यावीत. साहित्य प्रकाशनाबरोबरच वाड्मयीन सांस्कृतिक
विचारांना संधी देणारे नियतकालिक नियमित प्रकाशित केले पाहिजे.
वनवासी लोकसाहित्याचे आमूलाग्र संशोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी संशोधकांकडून क्षेत्राय अभ्यास (फिल्डवर्क) केले पाहिजेत. बनवासी जातींचा