पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शहरी सुशिक्षितालाही न झेपणारी आहे.

आदिवासींचे स्त्री-दाक्षिण्य :

 आदिवासी स्त्रिया कधी बेश्या म्हणून बावरतांना दिसत नाहीत. जवळ जवळ हा शरीर विक्रीचा व्यवसाय त्यांना वर्ज्यच आहे ही चालत आलेली परंपरा टिकली पाहिजे, आदिवासी भागात कधी आदिवासींमध्ये बलात्कार झाल्याचे ऐकिवात 'नाही. एक आदिवासी दुसऱ्या आदिवासींवर बलात्कार करूच शकत नाही, अशी . त्यांची समाज व्यवस्था रुढ झालेली आहे. लग्न करायला पैसे नसले तर ते काही काळ तसेच सहवासात राहून सवडीने लग्न तत्पूर्वी झालेल्या मुलांच्या साक्षीने करतात. आदिवासीत बाहेरख्यालीपणा किंवा विवाहबाह्य संबंध आढळत नाहीत. व्यभिचार नसल्याचे कारण म्हणजे पटत नसेल तर समाज पंचायतीकडून काडीमोड घ्यायची आणि दुसरा घरोबा त्या स्त्रिला करायची मुभा आहे. दुसरा घरोबा करतांनाही कमालीचे स्त्रीदाक्षिण्य व महोदात्त दृष्टिकोन आढळतो. समजात पुनर्विवाह करणारी स्त्री पहिल्या पतीपासून गरोदर असेल तर त्या भावी अपत्यासह त्या स्त्रीचे उत्तरदायीत्व स्वीकारले जाते. हे सारे राखता आले पाहिजे. आदिवासींच्या- 'विकासाची भारतीय संकल्पना यापेक्षा वेगळी नाही, त्यात त्यांच्या उपरिनिर्दिष्ट चांगल्या गोष्टी जपणे अभिप्रेत आहे. हे सारे मूळात जे चांगले गुण आहेत ते सांभाळून जतन करून वाढीला लावूनच आदिवासींचा विकास खऱ्या अर्थाने साधता येईल.

आदिवासी विकासाचा अंतीम टप्पा :

 आदिवासी विकास होतो आहे किंवा झाला आहे असे केव्हा म्हणतायेईल, तर आदिवासींनी परंपरेने पूर्वापार चालत आलेल्या चांगल्या प्रथा टिकविल्या, वादविल्या तरच, सुशिक्षणाबरोबर भारतीय सुसंस्कार घ्यावेत. जीवनाला अध्यात्माचे, धर्माचे अधिष्ठान प्राप्त करून द्यावे. सदाचाराचा मूलमंत्र जपावा आणि आत्मोन्नतीनंतर का होईना समाजोन्नतीसाठी तत्पर व्हावे, मुख्य प्रवाहात जरूर यावे, पण जुन्या नव्यांचा सांधा योग्य जुळवूनच.

आदिवासींजवळ भारतीय संकल्पनेतील ज्या गोष्टी अगोदरच चालत आलेल्या
८९