पाहिल्यावर लेखकानी खंत सादर केली आहे.
आदिवासींच्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेचा लेखकाने करून दिलेला परिचयही अत्यंत मनोज्ञ असा आहे. होळी पौर्णिमेच्या दिवशी आदिवासी त्यांच्या परंपरागत नृत्यगान उत्सवात आणि धार्मिक कामकाजात मग्न होऊन आपले जीवन काहिसे सुसह्य व कसे रोचक बनवतो याचे चांगले चित्रण, डॉ. भास्कर गिरधारी यांनी केले आहे.
बोहाडा उत्सवाची माहिती देण्याआधी दिवाळी, आखाती (अक्षय्यतृतीया) दसरा, कवळी भाजी, पोळा, नागपंचमी आणि बीजा, ह्या सणांचे आदिवासी जीवनातील वेगळेपण त्यांनी मोठ्या खुबीदारपणाने पण सहजतेने स्पष्ट केले आहे.
होळी पौर्णिमा आणि धूलिवंदन आटोपले की बोहाडा उत्सवाची तयारी सुरू होते. आदिमाता जंगदंबा हिचा विविध पण ठरीव वारी सोंगे काढून साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे बोहाडा. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार या पाच वारांनाच हा उत्सव केला जातो. देवदेवतांपासून तो मासा; राक्षस, सायदेव, पुंडलिक, रामतारी, झकारी ताटी, सखाई, होरा भिलीन, ताटी, करणीदेव, गवळ, कासव, वाघोबा, विमान, चारुण, खंडेराव. चंद्र, सूर्य राजा अशी एकेचाळीस सोंगे कशी नाचवली जातात, त्यांचे नेटके दृष्यांकन डॉ, गिरधारी यांनी केले आहे.
संबळ, तुतारी, सूरवाद्य, यांच्या तालासुरात ही सगळी सोंगे नाचतात. प्रत्येक देवाची नाचण्याची पध्दत ठरलेली असते. थाळगानाची माहितीही उद्बोधक आणि अनोखी आहे. त्यांच्या विविध गीतांची, डॉ. भास्कर गिरधारी यांनी पेश केलेल्या झलकही वेधक आहे. सीता हाक मारते, जंगल, कुंतीचे गाणे, सासरच्या घरी, हळदीनं भरलंय पातळ बायचं, काजळ्या डोहो माजविला, चल पोरी भर पाणी, दर्याच्या किनाऱ्याला उगवेला चंद्र, श्रावण बाळ जातो काशीला, आज मी नवस घेईन देवाला, आई तुझा नवस कोणी घेतला आणि शेवंतीची फुले, अशी बारा गीते त्यांनी नोंदली आहेत. त्यातील काव्य, कल्पनाविलास लयबध्दता