पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि शब्दांची मांडणी ही छंदशास्त्राच्या दृष्टीनेही प्रभावी आणि पृथगात्म अशी आहे.

 आदिवासींच्या लग्न, काज, मर्तिक, नव्या पिकाचे वाजत गाजत पूजा करुन देवास अर्पण करणे, नवसासायास, लक्ष्मीला सोन्याचे कमळ वाहून नवस फेडणे, काजाच्या दिवशी जोड्या जमवणे, ह्या सर्व प्रथांची डॉ. भास्कर गिरधारी यांनी यथोचित ओळख करून देऊन, ग्रंथाच्या मौलिकतेला रंजन उद्बोधनाची मितीही जोडली आहे. हे एक लेखकाच्या सखोल अभ्यासाचे फलितच म्हणावे लागते.

 आदिवासींच्या जीवनसारणीच्या अभ्यासाकडे आता प्रगत पौर्वात्याचे आणि पाश्चिमात्यांचेही लक्ष वेधले गेले आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठाही केला जातो. पण त्यामुळे आदिवासींच्या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही, हे डॉ. गिरधारी खेदपूर्वक नमूद करतात. आरंभीच त्यांनी आदिवासींच्या विविध रीतींच्या शोषणाकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणतात, बाहेरच्या लोकांची प्रसिध्दीसाठी घेतली जाणारी गाजावाजा शिबिरे प्रत्यक्षात काहीही बदल, आदिवासींमध्ये घडवण्यास निकामी आहेत.

 स्थानिक पातळीवर आदिवासींसाठी चालविल्या जाणाऱ्या चळवळींचीही त्यांनी वस्तुनिष्ठ मीमांसा केली आहे. नक्षलवादी व साम्यवादी विचारांचे लोक,(सच्च्या कार्यकर्त्याला आदिवासी) त्यांना आदिवासींचा हाच अडाणीपणा टिकवून ठेवण्यात रस असतो. असे धीट विश्लेषणही डॉ. गिरधारी करतात हे तर खूपच महत्त्वपूर्ण आहे असे मला वाटते.

 आदिवासींच्या भाषेचे वाक्प्रचार आणि म्हणींचेही मोठे आस्वाद्य भांडार, ह्या लेखसंग्रहात अनुस्यूत केले आहे. 'कणगीत दाणा तर भिल्ल उताणा', 'झाडं तथ वारा.. पडती पाण्याच्या धारा', 'शाळा दाराशी, पोरं गुराशी', ह्याचा बानगीदाखल विचार करता येईल.

 ह्या लेखसंग्रहातील सगळ्यात मौलिक भाग म्हणजे, आदिवासी तरुण

१०