Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांचे मनोगत व महत्त्वपूर्ण निरीक्षणे, आदिवासींचे दैनंदिन आयुष्य, त्यातील अपार कष्ट, त्यांच्या समजुती व अंधश्रध्दा, आदिवासींचे शिक्षण, त्यातील अडचणी, त्या विद्यार्थ्यांची मानसिकता व व्यथा, काम करणाऱ्या लोकांची विगारटाळू प्रवृत्ती, सरकारी योजना कशा कुचकामी, हे सिध्द करू पाहणाऱ्या मध्यस्थ यंत्रणा, त्यांच्यातील देवदेवस्की व भगतवर्गाचा प्रभाव, त्यांची नृत्ये, गानप्रकार, विवाह प्रकार, आदिवासींना जागरूक व प्रशिक्षित करण्याचे निमित्त साधून, त्यांना अकारण बंडखोरी नक्षलवादाकडे किंवा आत्मघातकी विचारांकडे नेऊन, शेवटी आदिवासींच्याच अडचणीला कारण होणारे, काही राजकीय पक्ष आणि तरूण भांबावलेला वर्ग, ह्या अवघ्याच सांस्कृतिक अंगोपांगाचा धांडोळा, ह्या पुस्तकात प्राचार्य डॉ. गिरधारी यांनी आत्मियतेने व संसूचक वेधकतेने घेतला आहे. ह्या ग्रंथाचे हे एक महत्त्वपूर्ण असे बलस्थान, म्हणूनच नोंदावे लागेल.
 विज्ञाननिष्ठेचा अभाव आणि अंधश्रध्देचा प्रभाव हे आदिवासींच्या मागासलेपणाचे मूलकारण आहे असे डॉ. गिरधारी यांचे अनुभवजन्य निरीक्षण आहे.
 आपली जिल्हावाटप पध्दतीही त्यांना पुनर्विचार करून तिची नवरचना व्हावी, असे डॉ. गिरधारी म्हणतात. ठाणे जिल्ह्यात सूर्यानगर ही एक परिपूर्ण आणि उत्कृष्ट वसाहत असल्याचे ते निःसंकोचपण सांगतात. मोठे जिल्हे किंवा महानगर यांचे केवळ रूप किंवा एक चेहरा पण त्याखेरिजही एक जिल्ह्याचा म्हणून काही अज्ञात अनोळखी चेहरा असतो. असेही भाष्य आदिवासी विकासाच्या दृष्टीने गिरधारी करतात ते अचूक असेच आहे.
 आपल्या देशात जातीपोटजातींच्या विषवल्लीमुळे आणि तिच्या पिढ्यापिढ्यांच्या लागणीमुळे किती भयानक नुकसान झाले आहे, त्याकडे त्यांनी वेधलेले लक्ष आणि दिलेले उदाहरण सुन्न करणारे आहे, ते असे -
 वसतिगृहात राहून शिकणारी, दुसऱ्यांच्या केवळ मेहेरबाणीने जगणारी दरिद्री आदिवासी मुलेही कातकरी बाईने शिजवलेले अन्न खाण्यास नकार देतांना