पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आदिवासींना दिले पाहिजे. भारतीय संकल्पनेतून आदिवासींचा विकास साधणे म्हणजे सुशिक्षित, सुसंस्कारित आदिवासींनी पुन्हा आपल्या अडी अडचणींची आणि मागासलेल्या समाजाची जाणीव ठेवून त्याच आपल्या बांधवांसाठी कार्य प्रवृत्त होणे होय. आपल्या भागात जाऊन पुन्हा काम करणे, श्रमाची लाज न वाटणे, गरीब आई वडिलांना सांभाळणे, मातीशी काम करून इमान राखणे या गोष्टी त्यांनी करावयाच्या आहेत हे त्याने केले तो खरा विकसित आदिवासी कार्यकर्ता झाला असे समजावे. भारतीय संकल्पनेत केवळ स्वतःचा विकास अभिप्रेत नाही तर आपल्या बरोबरच सर्वांचाही विकास घडविला पाहिजे. असा दृढ विचार आहे. म्हणूनच भारतीय संकल्पनेतून आदिवासींचा विकास सुयोजित व अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतो.

भारतीय संकल्पना जतन केल्यानेच विकास :

 मुळामध्ये आदिवासी समाजामध्ये अनेक चांगल्या गोष्टी भारतीय संकल्पनेतल्याच मुरलेल्या आहेत. त्यांना नव्या काळाच्या ओघात जतन करणे हेच महत्त्वाचे आहे. आदिवासी नेहमी सत्य, खरे तेच बोलणारा आहे. सहसा तो कमी बोलतो पण खोटं बोलत नाही. ही प्रवृत्ती आपण टिकवून ठेवली पाहिजे. आदिवासींकडे आपण पाहुणचार घेतला तर आपल्याला मुद्दाम दुधाचा चहा तो देतो, पण स्वतः कोरा चहा पितो. यांचा अर्थ केवळ दूध घेण्याची ऐपत नाही असा नाही, तर मूळात आईचेदूध जसे तिच्या मुलासाठी असते, तसे गाईचे दूधही तिच्या वासरासाठीच असते. आदिवासीचे स्वतःचे जरी शोषण होत असले तरी तो इतरांचे करीत नाही. त्याला शोषणच काय, पण गाईम्हशींचे 1 दोहन2 सुध्दा मान्य नाही. ही प्राणीमात्रांवर दया करणारी संस्कृती भारतीय संकल्पनेत मोडते. हे आदिवासींचे सारे संस्कार मूळचे आधिकाधिक कसे वाढवता येतील हा त्यांना नव्या मुख्य प्रवाहात आणतांनाचा मोठा प्रश्न आहे.

 आदिवासी भागात चोरीचे प्रमाण जवळ जवळ नाहीच, आदिवासी कधी चोरी करीतनाहीत. कोणाच्या वस्तूला हात लावत नाही, आदिवासी कधी भीक मागतांना दिसत नाही. म्हणजे स्वाभिमानी वृत्तीने न बोलता दिवसभर उपाशी

राहणे तो पत्करतो. पण कोणापुढे हात पसरत नाही, ही गोष्ट शिकण्यासारखी व

८८