पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जेव्हा आदिवासी जागा होतो :

 आदिवासी शिकला सुधारला का मग नक्षलवादी आणि साम्यवादी संकल्पनेत कधीच बांधला जाऊ शकत नाही याच भीतीपोटी आपले नेतृत्व शाबीत रहावे म्हणून आदिवासी विकासाच्या नावाखाली वापर केला गेला आणि अद्यापही केला जात आहे. दहशतवादाने ही भयावह परिस्थिती 'आदिवासींच्या अडाणीपणातून, या प्रवृत्तीच्या चळवळींना यापुढेही चालूच ठेवावयाची आहे.अन्यथा आदिवासींच्या विकासासाठी काढावयाचे मोर्चे आणि करावयाची आंदोलने यासाठी त्यांनी आदिवासींना वेठीला धरले नसते. त्यांच्याकडून रुपयेही गोळा केले नसते. हा त्यांचा अज्ञानाचा राजकीय नेते मंडळी उठवित असलेला लाभ आहे.

 मात्र आदिवासी जेव्हा खऱ्या अर्थाने जागा होतो, त्याला परिस्थितीचे भान, जाण आणि परिस्थितीची समज येते, तेव्हा तो या प्रवृत्तींच्या जवळही फिरकतांना दिसत नाही. आज शिक्षणाला सुसंस्कारांची जोड देऊन झालेल्या आदिवासींच्या विकासाला योग्य दिशा लाभणे महत्त्वाचे आहे. आणि ते खरे सामर्थ्य आहे भारतीय संकल्पनेतच.

आदिवासींचा भारतीय संकल्पनेतून विकास :

 भारतीय आदिवासींना भारतीय संस्कृतीच्या मुख्य प्रवाहात आणायचे म्हणजे भारतीय पध्दतीचे, जीवनमूल्य नैतिक मूल्यांचे शिक्षण द्यायचे. महाविद्यालयीन- विद्यापीठीय शिक्षणासह, तंत्रज्ञानात कुशल बनवावयाचे आहेच पण त्या सुसंस्कारित करावयाचे आहे. भक्कम तत्त्वज्ञानाच्या पायावर त्यांना उभे करावयाचे आहे. हे तत्त्वज्ञान अध्यात्माला आणि धार्मिकतेला महत्त्व देणारे असेल. त्यासाठी आवश्यक तो वेळ आणि प्रशिक्षण विद्यापीठीय अभ्यासक्रम पूर्ण करतांनाच