पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विकासाच्या नावाखाली अनर्थ होणार नाही. जशा आज इतर काही संघटना स्वयंसेवी संस्था चळवळीच्या मध्ये आदिवासीला एका प्रकारच्या नवीन वेठबिगारीला सामोरे जावे लागत आहे.

 आपण रुंद्राचे जर वाचन केले तर त्यात समाजातील सर्वच घटकांच्या विकासाचा उल्लेख केलेला आढळतो. कुसुमाग्रजांच्या प्रेम कोणावरही करावे, या कवितेतील निर्वेर मनोवृत्ती आपल्या भारतीय संस्कृतीत आणि संकल्पनेत आहे. तिथे कुणाचा दुःस्वास नाही. अनसूयावृत्ती आहे. वस्तुत: इतरांचे उल्लेख करण्याचीही आवश्यकता नाही. पण विकासाची भारतीय संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी नाईलाजाने उल्लेख करावे लागतात.

ख्रिश्चन मिशनऱ्यांचे मूळ उद्दिष्ट :

 प्रगट व अग्रगट स्वरुपात का होईना पण धर्मांतर आहे हे निर्विवाद, कारण आरोग्य शिक्षण या सेवेची परिणत्ती शेवटी धर्मान्तरात होतांना दिसते. किंबहुना अनुभव तर असाही आहे की कायदा, खर्च केलेला पैसा, केलेले उपकार, दाखविलेली दया, यांचे भांडवल करून एक प्रकारचा धाक निर्माण केला जातो. किंबहुना दहशत निर्माण केली जाते. आणि मग धर्मान्तराशिवाय पर्याय उरत नाही. एकदा धर्मान्तर झाले की, पुन्हा इच्छा असूनही या दहशतीच्या वातावरणामुळे पुन्हा हिंदू व्हायला ख्रिश्चन मंडळी मज्जाव करतात. जी गोष्ट खिश्चन मिशनऱ्यांची तीच गत नक्षलवादी आणि साम्यवादी मंडळींची आहे. ते आदिवासींना वेळी अवेळी मदत करून त्यांच्यावर उपकार करून, मैत्री व सतत संपर्क दाखवून त्यांना बांधून घेतात. त्यांच्या उपकाराच्या व खरोखरच रात्री बेरात्री होणाऱ्या मदतीच्या भाराने आदिवासी पूर्णपणे त्यांना बांधला जातो. मग अज्ञान अनारोग्य, दारिद्रय तसेच राखून त्याचा उलट सामुदायिक वापर करून गैरफायदा घेतला जातो. आणि हे सारे घडते ते मात्र आदिवासींच्या विकासाच्या नावाखाली. मग असे हे नक्षलवादी, साम्यवादी चळवळीचे पाडे बालेकिल्ले बनतात. तेथे शिक्षणाला खऱ्या विकासाची तळमळ बाळगणाच्या कार्यकर्त्यालाही मग अनाधिकृत प्रवेशाला बंदी असते. परिवर्तनाला तो भाग विन्मुख होऊन बसतो. चळवळीच्या नेत्यांना हाच

अडाणीपणा टिकवून ठेवण्यात रस असतो.

८६