पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेगळा विकासाचा विचार आपल्याला करावा लागत नाही. जसा समाजातील इतर अनेक घटकांच्या विकासाचा आपण विचार करू तसाच तो आदिवासीचाही भारतीय संकल्पनेत केला जातो. मग आदिवासींचा विकास हे काम स्वतंत्रपणे वनवासी कल्याण आश्रम सारख्या स्वयंसेवी संस्थांनी का हाती घेतले, तर त्याचे उत्तर समाजातील मागे राहिलेला अविकसित, दुर्बल असा हा आदिवासी समाज आहे. आई ज्याप्रमाणे अशक्त मुलांबर अधिक लक्ष, संपूर्ण कुटुंब सांभाळून देत असते तशीच ही भूमिका आहे. शाहू महाराजांच्या संदर्भात एक आठवण सांगितली गेली आहे. त्यांना एकाने प्रश्न विचारला, बाकीचे सगळे घोडे एकटे हरभन्याचा तोबरा खातात मग त्या एका घोड्याला स्वतंत्र वेगळा तोबरा का. यावर शाहू महाराजांनी उत्तर दिले की, तो अशक्त आहे, दुबळा आहे. इतर घोडे त्यांच्या वाट्याला हरभरा येऊ देणार नाहीत म्हणून त्याला इतरांच्या सारखा समान होईपर्यंत वेगळा तोबरा देणार. मात्र तो सशक्त तडफदार झाला की मग त्यालाही सगळ्यांसह हरभरा खाता येईल. अशीच ही स्थिती आहे. आदिवासी अनेक दृष्टीने रंजला गांजला म्हणून अशक्त बनला आहे. त्याला शिक्षण, आरोग्य, नोकरी या सुविधा सवलतींसह पुरवून समान पातळीवर आणले पाहिजे. मग विशेष सवलतींची गरजच राहणार नाही. आज जसे त्यांचे शोषण होते तसे होता कामा नये. असे झाले तर त्याला विशेष सवलतींची गरज राहणार नाही.

 भारतीय संकल्पनेते मूळात आदिवासी हा संपूर्ण समाजाचा एक अंगभूत घटकंच मानलेला आहे. महात्मा गांधींनीही त्यांच्या यंग इंडिया2 मधील एका लेखात आदिवासी हा हिंदूच आहे. त्याला वेगळा मानणारे चूक करतात असे. सांगितले आहे. १९२१ पूर्वी जी जनगणना होत होती त्यात आदिवासींची वेगळी नोंद केली जात नव्हती. त्यांचा ब्रिटीश अधिकाऱ्यांनीही हिंदूंमध्येच समावेश केलेला होता. या गोष्टी विशेष लक्षणीय व मुद्दाम उल्लेखनीय आहेत. आदिवासींचा म्हणून - काही वेगळा विकासाचा विचार भारतीय संकल्पनेत मूळात नाहीच.

भारतीय संस्कृतीची रुजवात :

 आदिवासींमध्ये भारतीयत्व मूळात आहेच. भारतीय संस्कृतीच्या आधाराने आदिवासींच्या विकासाची दिशा ठरविणे महत्त्वाचे आहे. म्हणजे आदिवासी

८५