पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्रेष्ठ ज्ञानदेव पुढे असेही म्हणतात की सदोदित ज्ञानी, योगी अधिकारी माणसांनी समाजाभिमुख वृत्तीने जगावे. संतांच्या विभूती जगाच्या कल्याणासाठीच असतात म्हणूनच संत ज्ञानदेव म्हणतात-

मार्गाधारे वतवि
विश्व मोहरे लावावे |
अलौकिक नोहावे
लोकांप्रती ||

 लोकांसाठी आपण अलौकिक असूनही अलौकिक होऊन राहू नये. तेव्हा भारतीय चिंतन आणि संकल्पना या 'सर्वे पि सुखिना सन्तु', 'आनो भद्रो कृतवो यंन्तु विश्वतः,' ‘सा विद्या विमुक्तयें', 'सत्कर्मी रती वाढून', 'भूतो परस्परे जडो, मैत्र जीवाचे’, ‘जो जे वांछिल तो ते लाह्ये, प्राणिजात', 'नहिज्ञानेन सदृश्यं पवित्रमिह विद्यते.’ यासारख्या अनेक बोधवाक्यात गुंफलेल्या आहेत.

 अध्यात्माच्या विचारकणांमध्ये भारतीय संकल्पना अनुस्यूत आहेत. पुन्हा हे सारे करित असतांना कोणा दीनावर आपण दया करणे, या भावनेने हे करायचे. नाही तर निरपेक्ष, नि:स्वार्थी निस्पृह भावनेनेते करावयाला भारतीय संकल्पनेचा आधार भगवतगीता सांगते.

 अशा वृत्तीने आणि दिशेने आदिवासींच्या विकासासाठी आपली वाटचाल व्हायला पाहिजे. मनात उदात्तभाव, बंधुभाव असावा, समान पातळीवर मुख्य प्रवाहात भारतीय तत्त्व जपून, आदिवासींच्या विकासासाठीच्या दिशा आपल्याला निश्चित करता येतील. अध्यात्माच्या तत्त्वज्ञानाच्या भक्कम भारतीय बैठकीतून आदिवासींचा विकास निश्चित रुपात प्रयत्नपूर्वक घडवून आणता येईल. ही भारतीय संकल्पनाच आदिवासी विकासाला उपकारक ठरणारी आहे.

आदिवासी विकासात भारतीय संकल्पनेचे मोल :

 आदिवासींच्या विकासासाठी भारतीय संकल्पनेचे मोल फार महत्त्व आहे.विशेष आहे प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, आदिवासी विकास म्हणजे काही

८४