पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि इतरांचे सुख ते आपले सुख असे मानायला भाग पाडते. माणुसकी ची जाणीव ठेवायला जावते. आणि माणसामाणसातले संबंध पाळायला टिकवायला भाग पाडते. कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षाही प्रत्यक्षात जुळलेले नाते मग ते सहवासाने वा परस्पर सहकार्य, सदभावनेने निर्माण झालेले नाते असले तरी त्याचे मोल अधिक असते हे लक्षात आणून देते.

 भारतीय संकल्पनेत केवळ स्वतःचा व्यक्तिगत विकासाचा प्रगतीचा वा उन्नतीचा विचार नाही तर भारतीय संकल्पनेत सगळ्यात महत्त्व दिले जाते ते स्वतः बरोबरच, सभोवतालच्या, इतरांच्या विकास, प्रगती, आणि उन्नतीच्या प्रक्रियेला. आपण शिकावे आणि इतरांना शिकवावे असे आहे. समर्थांनी म्हटलेच आहे -

जे जे आपणांसी ठावे |
ते ते इतरांशी शिकवावे ||
शहाणे करुन सोडावे |
सकळजन ||
किंवा
तुका आकाशाएवढा होऊनही म्हणतो,
"तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता." ||

 आपण स्वतः विशाल, उदात्त होऊन केवळ परोपकारासाठी जगायला शिकावे.केवळ उपकार करण्यासाठी उरायचे असते.

स्वतःचे साधले म्हणजे सिध्द पुरुष होतो असे नाही. सिध्दपुरुष संत ज्ञानेश्वर होते.कारण त्यांनी म्हटले आहे -

'जे जे भेटिजे भूत |
ते ते मानिजे भगवंत |

 भेटणाच्या प्रत्येक प्राणिमात्राला - माणसाला परमेश्वर, भगवंत मानून त्याची विकासाची जबाबदारी उचलली पाहिजे. म्हणजेच पूजा बांधली पाहिजे, म्हणूनच

८३