पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे असे म्हणता येईल.

 जी गोष्ट आर्थिक परिस्थितीची तीच त्यांच्या अडाणीपणाचाही आहे. थोडे बहुत शिक्षण घेतलेले आदिवासी आता आढळतात, परंतु फार थोडे पदवीपर्यंत पोहोचलेले आहेत. बाकीचे जेमतेम वर्ग ३ किंवा ४ च्या नोकऱ्यात शासनाच्या खास राखीव जागेच्या मोहिमेत लागून त्यातच समाधान मानतांना दिसतात. हे शिक्षणही फारच थोड्या लोकांनी घेतलेले दिसते. आकडेवारी पाहिल्यास अद्यापही बहुसंख्य आदिवासी बांधव पुरुष स्त्रिया अशिक्षित आणि अडाणीच आहेत. अर्धवट शिक्षण घेतलेल्या या मुलांनी 'पाडा सुधारला' असे म्हणता येत नाही. एका पाड्यावर भोजकेच दोन चार शिकलेले बाकी सगळे अंडाणीपणातच गुरफटलेले आढळतात. ही वस्तुस्थिती पाहता गरिबी, अनारोग्य, आणि अडाणीपणा दूर करणे, त्यांना भारतीय संस्कृतीची दिशा दाखविणे म्हणजेच आदिवासींना विकासोन्मुख करणे आहे. त्यासाठी शिक्षण हाच एकमेव दिलासा आणि आधार वाटतो.

भारतीय संकल्पना म्हणजे काय ?

 अशा या अविकसित राहिलेल्या भारतीय संकल्पना समजावून घेतांना पहिल्यांदा भारतीय संकल्पना म्हणजे काय हे नीट स्पष्ट केले पाहिजे. भारतीय संकल्पना म्हणजे ज्या योजनेत संकल्पनेत भारतीयत्व आहे, आपली भारतीय संस्कृतीची मूल्ये, जीवन आणि नैतिक मूल्ये जतन केलेली आहेत. सदाचाराला आणि अध्यात्मिक, जीवनाच्या बैठकीला प्राधान्य दिलेले आहे, संयुक्त कुटुंबपध्दतीला माणसामाणसातील विविध नाते संबंधाला प्राधान्य आहे. माता, पिता, गुरू, वृध्दांबद्दलचा आदरभाव ज्यातून व्यक्त होतो. धार्मिक आचरणाने मानसिक समाधान ज्यातून मिळू शकते ते सारे या भारतीय व्यापक संकल्पनेत साठवलेले आहे.

 भारतीय संकल्पना आत्मौपम्यबुध्दी जागविते. त्यांच्या जागी मी आहे. सोक्हम् एका वेगळ्या अर्थाने लक्षात आणून देते. दुसऱ्याचे दुःख ते आपले दुः