पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आदिवासी शैक्षणिक विकासाची भारतीय संकल्पना


 आदिवासी शैक्षणिक विकासाच्या दिशेने विचार मंथन आणि चिंतन विपुल प्रमाणात झालेले आहे. तथापि प्रत्यक्षात आदिवासी बांधवांचा विकास उदाहरणावरुन वा अपवादात्मक परिस्थितीत झालेला दिसतो. आदिवासींसाठी स्वयंसेवी संस्था आपापल्या परीने प्रयत्नरत आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या कार्याचा उसा शासनावर उमटवून शासनालाही त्या दिशेने विचार करून विविध योजना स्वीकारायला लावलेल्या आहेत. शिवाय शासनाच्याही योजना आहेतच, पण अद्यापही आदिवासींचा विकास साधला आहे आणि नव्या औद्योगिक संगणकाच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या संस्कृतीत सहभागी होण्याचे सामर्थ्य किंवा कुवत आदिवासी बांधवात आलेली दिसत नाही.

 यासाठी नेमके काय करायला पाहिजे हा प्रश्न भल्याभल्यांना भेडसावतो आहे. पुन्हा पुन्हा विचार करायला लावतो आहे. या भागात वावरणायाला वेदना होत आहेत. अजूनही आदिवासी मुख्य प्रवाहाला सामोरा जाऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने समाजात तो का मिसळतं नाही. तथाकथित मुख्य प्रवाहात का येत नाही हे प्रश्नच अनुत्तरीत आहेत.

अनारोग्य, गरिबी, अडाणीपणा :

 या प्रश्नांचा जेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करू लागतो, तेव्हा आपल्याला दिसते की आदिवासी बांधव कुपोषणाला सामोरा जातो आहे. त्याला अपेक्षित आहार अद्यापही मिळत नाही. त्यामुळे आरोग्याची ही समस्या स्त्री, पुरुष आणि बालकांनाही ग्रासून टाकीत आहे. दारिद्र्य हे तर आदिवासींच्या पाचवीलाच पूजलेले आहे. जरा कुठे दिलासा देणारी स्थिती निर्माण होत आहे. थोडी हिरवळ त्यांच्या जीवनात शिक्षणाने येत आहे पण त्यातही हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. आदिवासी बऱ्यापैकी घरे बांधून राहत आहेत. पण अजूनही ते कर्जबाजारी आहेत. आता सावकारांचे नसतील पण बँकेचे आहेतच. नवीन जमीन खरेदींची ताकद अजून त्यात आलेली नाही. आहे ते सांभाळून आहेत. आदिवासी म्हणून मिळणाऱ्या नोकऱ्या आणि घरदार शेती करणारे थोडे बऱ्यापैकी सुस्थितीत

८१