पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या गीतातील भाव मातृप्रेम नसून देवी किंवा कुंती हा अर्थ आई शब्दातून लागतो. कारण कुंतीची मुलं व पाची पांडव यांचा उल्लेख येतो. भीमाचे आणि अर्जुनाचा पराक्रम या सामर्थ्यावर या आईचे देऊळ बांधून नवस फेडला जाण्याची भावना या गीतात व्यक्त केली आहे.

शेवंतीची फुले

शेवंतीची फुले न गुंफूनिया हार न पाहिला हार कुणाला
पहिला तो हार न माया गणपती देवाला ग........२
शेवंतीची फुले न गुंफूनिया हार न दुसरा हार कुणाला
दुसरा तो हार न माया श्रीकृष्ण देवाला ग......२
शेवंतीची फुले न गुंफूनिया हार तिसरा हार कुणाला
तिसरा तो हार न माया लक्ष्मी मातेला ग .....२
शेवंतीची फुले न गुंफूनिया हार चौथा हार कुणाला
चौथा तो हार न माया संतोषी मातेला ग......२
शेवंतीची फुले न गुंफूंनिया हार न पाचवा हार कुणाला
पाचवा तो हार माया रेणुका मातेला ग.....२

 आदिवासींना उपजतच फुलांची हारांची आवड आहे. त्यांना फुले माळायला आवडते. तसेच देवाला बाहणेही आवडते. या गीतात सुगंधी शेवंतीची फुलं गुंफून किंवा माळून पहिला हार गणपतीला, दूसरा हार कृष्णाला, तिसरा लक्ष्मी मातेला, चवथा हार संतोषी मातेला वाहिला आहे. पाचवा हार रेणुका मातेला वाहिला आहे. नवल म्हणजे ज्ञानेश्वरांनी म्हटलेले ओम नमोजी अशा त्या गणपतीलाच पहिला हार आदिवासीही आपल्या लोकगीतातून अर्पण करतात. याचा अर्थ

आदिवासींची हिंदू देव-देवतांना भजण्याची पूर्वापार परंपरा चालत आलेली आहेच.

८०