पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आईबापांना तहान लागली म्हणून झारीने पाणी आणायला जातो आणि दशरथाच्या बाणाने मृत्युमुखी पडतो. विशेष म्हणजे श्रावणाच्या आई वडीलांचे लाव सुध्दा आदिवासींना माहित आहे. ते 'विठ्ठल रुखमाई' असे नांव सांगतात.

आज मी नवस घेईन देवाला

आज मी नवस घेईन देवाला की गणपतीला
सोन्याचा टेबल वाहीन देवाला की गणपतीला
आज मी नवस घेईन देवाला की श्रीकृष्णाला
सोन्याची बासरी वाहीन देवाला की श्रीकृष्णाला
आज मी नवस घेईन देवीला की संतोषीला
सोन्याची तलवार वाहीन देवीला की संतोषीला
·आज मी नवस घेईन देवीला की लक्ष्मीला
सोन्याचा कमळ वाहीन देवीला की लक्ष्मीला

 नवसावर आदिवासींचा विश्वास आहे. तसाच देवावरही हे या गीताने स्पष्ट होते. देव आणि देवाच्या आवडीच्या वस्तू या गीतात आल्या आहेत, ग सोन्याचा टेबल देऊ, श्रीकृष्णाला बासरी, संतोषी मातेला सोन्याची तलवार, लक्ष्मीला सोन्याचे कमळ वाहण्याचा नवस येथे केला आहे. देव देवता आणि त्यांच्या आवडी आदिवासींना भिणल्याचे येथे नवल वाटते.

आई तुझा नवस कोणी घेतीला

आई तुझा नवस कोणी घेतीला ग आई तुझा नवस कोणी घेतीला
घेतीला पाची पांडवांनी ग भीमा अर्जुनानी
आई तुझ देऊळ कोणी बांधील ग आई तुझ देऊळ कोणी बांधीलं
बांधील पाच पांडवांनी ग भीमा अर्जुनानी
आई तुझा नवस कोणी फेडीला ग आई तुझा नवस कोणी फेडीला
फेडीला पाची पांडवांनी ग भीमा अर्जुनानी

७९