- प्रा. केशव मेश्राम
डॉ. भास्कर गिरधारी हे लोकसाहित्याचे साक्षेपी अभ्यासक आहेत. आरसा : आदिवासी जीवनशैलीचा हा त्यांचा, या विषयावरील नवा ग्रंथ. आदिवासी पट्ट्यात डॉ. गिरधारी यांनी, जे काम केले आहे, ते मुंबई विद्यापीठाच्या पातळीवर आणि लोकमानसातही मान्यता पावले आहे.
प्राचार्य डॉ. भास्कर गिरधारी हे नुसते लोकसाहित्य आणि आदिवासींच्या आयुष्याचे कोरडे ग्रांथिक अभ्यासक नाहीत, तर जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागात प्रत्यक्ष आदिवासी लोकांत आणि विद्यार्थ्यात, त्यांच्यातलेच एक होऊन, मन रमलेले, सुधारकी पुरोगामी विचारांचें, चिंतनशील अभ्यासक आहेत.
ह्या ग्रंथात त्यांनी, आपल्या वेळोवेळी केलेल्या सत्तावीस लेखांचे आणि संग्राह्य तीन परिशिष्टांचे संकलन सादर केले आहे.
इंग्रजी विद्येला विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी वाघिणीचे दूध म्हटले होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, शिक्षण हाच प्रगतीचा महामंत्र आहे हे ओळखून, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा ! असा संदेश समस्त तळागाळातील वर्गाला दिला होता.
ह्या ग्रंथातील लेखांचे चार प्रभागात विभाजन केले आहे. आपली समाजव्यवस्था, आपली शिक्षणव्यवस्था आणि आदिवासींना स्वयंपूर्ण करण्यासाठी उद्योगव्यवसायांची उभारणी करण्याचे अगत्य आणि परिशिष्टांतर्गत आदिवासी निवडक साहित्यसूची आणि आदिवासी नियतकालिके, अशा चार भागात मांडणी केली आहे. ग्रंथसूची व पेठच्या आवारी गुरूजींचाही परिचय महत्त्वाचा आहे.
ह्या विविध लेखांतून प्रकट झालेले प्राचार्य डॉ. भास्कर गिरधारी यांचे विचार,