पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धरा धरा सीताबाई आता सीताबाई दिराचा छंद |
सोडा सोडा सीताबाई आता सीताबाई बहिणीचा छंद ||
धरा धरा सीताबाई आता सीताबाई नंदेचा छंद |
दर्याच्या किनात्याला एक किनाऱ्याला उगवेला चंद्र |

या गीतातही कोळी गीताची नक्कल आहे. पण काही आदिवासी किनाऱ्यालगत राहतात. सागराच्या किनाऱ्याला एक चंद्र उगवला आहे म्हणजे या गाण्यातल्या खुणा सीता नावाच्या मुलीचे लग्न झाले व तिला नवा प्रकाश लाभला म्हणून हे सीताबाई तू आता आईचा छंद सोड आणि सासूचा छंद घर, भावाचा, बहिणीचां सोडून दीर नणंदेचा छंद घर मुलीला शहाणपण शिकविणाऱ्या या गीतात छंद शब्दाला जोडीचा यमक जुळणारा चंद्र शब्द झाला आहे. अर्थात तो प्रेमाचे प्रतीक आहेच.

श्रावण बाळ जातो काशीला

श्रावण बाळ जातो काशी ला रे जातो काशीला
मात्यापित्याची कावड खांद्याला रे कावड़ खांद्याला
मात्यापित्यांना तहान लागली रे तहान लागली
कावड उतरली वृक्षाफांदीला रे वृक्षाफांदीला
श्रावण बाळ गेला पाण्याला रे गेला पाण्याला
झारी बुडवतांना आवाज आला रे आवाज आला
दशरथ राजाने बाण सोडीला रे बाण सोडीला
. श्रावण बाळाच्या छातीत घुसीला रे छातीत घुसीला
श्रावण बाळ धरती पंडीला रे धरती पडीला
श्रावण बाळ जातो काशीला रे जातो काशीला

हे गीत श्रावणाची करुण कहाणी सांगणारे आहे. आदिवासी थाळगाण लावतांना सुध्दा श्रावणबाळाची कथा समरसून सांगतो. ही कथा खूपच लोकप्रिय दिसते. माता पित्याची कावड खांद्यावर घेवून श्रावणबाळ काशीला जातो.

७८