पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चल पोरी भर पाणी

चल पोरी भर पाणी लवकरी ग ठाण्याला जायाला वेळ झाली.....
ठाण्याला गेली पोर ठाणेवाली झाली ठाणेला गेली पोर ठाणेवाली झाली
भुलीन तुझ्या नवऱ्याला मला फसवले गरीबाला
भूलीन तुझ्या नवऱ्याला मला फसवले गरीवाला
चल पोरा भर पाणी लवकरी ग मुंबईला जायाला
वेळ झाली चल पोरी भर पाणि लवकरी ग
मुंबईला जायाला वेळ झाली
मुंबईला गेली पोर मुंबईवालीन झाली
भुलीन तुझ्या नखयाला मला फसवले गरीबाला
भुलीन तुझ्या नखयाला मला फसवले गरीबाला

 या गीतात नित्याच्या पाणी भरण्याच्या क्रियेचे नादमय चित्रण धृवपदात आले असून एका प्रियकरांची व्यथा चटकदार पण वर्णिली आहे. चल पोरी तू लवकर पाणी भर कारण आपल्या ठाण्याला जायची वेळ झाली. पण ती ठाण्याला जाऊन ठाण्यावाली आणि मुंबईला जाऊन मुंबईवाली होऊन बसते. आणि तिच्या नखऱ्याला भुलून हा बिचारा गरीब प्रियकर नाहक फसवला गेला.

दर्याच्या किनाऱ्याला उगवेला चंद्र

दर्याच्या किनाच्याला एक किनाच्याला उगवेला चंद्र |
सोडा सोडा सीताबाई आता सीताबाई आईचा छंद ||
धरा धरा सीताबाई आता सीताबाई सासूचा छंद |
दर्याच्या किनान्याला एक किनाऱ्याला उगवेला चंद्र ||
सोडा सोडा सीताबाई आता सीताबाई बापाचा छंद |
धरा धरा सीताबाई आता सीताबाई सास्याचा छंद ||
दर्याच्या किनाऱ्याला एक किनाज्याला उगवेला चंद्र |
सोडा सोडा सीताबाई आता सीताबाई भाषाचा छंद ||

७७