पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
काजळ्या डोहो माजविला

काजळ्या डोहो माजविला माजविला काजळ्या डोहो माजविला
कुंभार नवरा सजविला सजविला कुंभार नवरा सजविला
कुंभार नवरा नको मला नको मला कुंभार नवरा नको मला
मटकी घडाय लाविल मला लाविल मला मडकी घडाय लाविल मला
'काजळ्या डोहो माजविला याजविला काजळ्या डोहो माजविला
भंडारी नवरा सजविला सजविला भंडारी नवरा सजविला
भंडारी नवरा नको मला नको मला भंडारी नवरा नको मला
ताडी ओतायला लाविल मला लाविल मला ताडी ओतायला लाविल मला
काजळ्या डोहो माजविला माजविला काजळ्या डोहो माजविला
मास्तर नवरा सजविला सजविला मास्तर नवरा सजविला
मास्तर नवरा नको मला नको मला भास्तर नवरा नको मला
छडी द्यायला लाविल मला लाविल मला छडी द्यायला लाविल मला
काजळ्या डोहो भाजविला, माजविला काजळ्या डोहो माजविला

 या गीतात गोड काळिमा पसरलेला डोह भरतीला आला आहे. कोळी गीतांची लयं पकडून हे गीत रचलेले असावे, यामध्ये मुलीची नवऱ्या बद्दलची आवड निवड व्यक्त झाली आहे. एकेका व्यवसायाला ती नकार देते. कुंभार नवरा मडकी घडवायला लावील म्हणून नको, भंडारी नवरा ताडी आणायला लावील म्हणून. नको, मास्तर नवरा नको कारण तो मला छडी द्यायला लावील, असे करत करत प्रत्येक व्यवसायातील दोष खुबीने दाखविले आहे. याचा आनंद आदिवासी मुली गाणे गातांना लुटतात.
 (काजळ्या प्रकारच्या मासोळ्यांनी युक्त असा डोह पालापाचोळा रंगवितात. त्या रंगाने मासे आंधळे बनतात आणि मरणोन्मुख होऊन आदिवासींच्या

हाती लागतात अशी ही प्रक्रिया आहे.)

७६