पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रे कर्ण हा पांडव रे महिला || १ ||
नव महिने गर्भ जपिला
सूर्य मंत्राची कर्ण हा आला
काळा कर्ण अवतरला रे देवा काळा कर्ण अवतरला
रे कर्ण हा पांडव रे पहिला || २ ||
नाही घेतले कधी बाळाला
प्रेमाणी नाही चुंबीले त्याला
केला अर्पण गंगेला रे कर्ण हा पांडव रे पहिला || ३ ||
नकुल, सहदेव, भीम, अर्जुन
पांचवा तो राजा हा तो धर्म
सहावा माझा कर्ण
रे कर्ण हा पांडव रे पहिला || ४ ||

 रामायणाप्रमाणेच महाभारतही आदिवासीमध्ये पुरते मुरलेले आहे. या कुंतीत्या गाण्यात महाभारतातील उपेक्षित कर्णाची व्यथा तीव्रतेने साकार झालेली आहे. हे गाणे ज्या स्वरात आळवले जातें तो विलक्षण कुरूण आहे. आपले दुःख कुंती कृष्णाला सांगते ते असे कर्ण पहिला पांडव, सूर्य मंत्राने नऊ महिने गर्ने जपून अवतरला पण प्रेमविणा तो गंगेलाच अर्पण करावा लागला. पांच पांडवात सहावा कर्ण शोभला असता, पण प्रखर तेजापासून हाय रे देवा हा काळा कर्ण अवतरला. ही अत्यंत सूचक कल्पना आहे.

सासरच्या घरी

सासरच्या घरी ग बाई मी बाबा कुणाला म्हणू
म्हण ग म्हण ग लेकी तुझ्याच ग सासऱ्याला
सासरच्या घरी ग आई मी आई कुणाला म्हणू
म्हण ग म्हण ग लेकी तुझ्याच ग सासूला
सासरच्या घरी ग आई मी भाऊ कुणाला म्हणू
म्हण ग म्हण ग लेकी तुझ्याच ग दिराला

७४