आता कशाले रडतेस ग||१|| जंगल जंगल
गळ्यातले गठण केले नग सीता केले ग
आता कशाले रडतेस ग || २ || जंगल जंगल
जंगल गं आई जंगल ग जंगलाच्यामध्ये मला दिलंय ग
हातातच्या बांगड्या केल्या न ग सीता केल्या न ग
आता कशाले रडतेस ग|| ३ || जंगल जंगल
कानातल्या रांगा केल्या न ग.सीता केल्या न ग
आता कशाले रडतेस ग|| ४ || जंगल जंगल
नाकातली नथनी केली न ग सीता केली न ग
आता कशाले रडतेस ग || ५ || जंगल जंगल
जंगल या गीतात जंगलचे राजे म्हणविणाऱ्या आदिवासींच्याच लेकीचे दुःख उत्कटतेने चित्रीत केले आहे. ती लेक आईला रडून सांगते की मला जंगलामध्ये का दिले. याचा अर्थ नागरी जीवनाचे सुप्त आकर्षण या वनवासी सीतेला आहे. जंगल शब्दाच्या प्रासात्मक लयीतून जंगलाचा उबग प्रभावीपणे व्यक्त झाला आहे. लेकीच्या समजुतीसाठी मग जंगलाच्या या राजाने (नवरा) केलेल्या दागिन्यांची यादी गाण्यात येते. त्यावरून पायातले पैंजण, गळ्यातले गठन, हातातल्या बांगड्या, नाकातली नथनी हे दागिने आदिवासींचे आवडते आहेत. याचा बोध होतो. शिवाय महिला जगताला प्रिय असलेल्या दागिन्यांची हौसही या गाण्यातून भागते. तांबे, पितळ, कथिल या धातूंच्याच दागिन्यांवर आदिवासी महिला बरा आनंद उपभोगतात.
कुंतीचे गाणे
सांगते देवाला रे कुंती सांगते कृष्णाला
रे कर्ण हा पांडव रे पहीला रे कर्ण हा पांडव पहिला रे || धृ ||
फुल तोडण्यासाठी गेले जल देवीला
सूर्य मंत्राची आठवण मजला
सूर्य मंत्र जपीला रे देवा सूर्य मंत्र जपीला