पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आदिवासी मौखिक संपदा


आदिवासींच्या पारंपारिक व दैनंदिन जीवनातील गीते विस्मृत होवू नये म्हणूनती छापील स्वरूपात उपलब्ध व्हावीत असा प्रयत्न आहे.

सीता हाक मारते

सीता गेलीय वारूळे तळेला सोनु कंबळायला |
हाक मारीते दशरथाला ग तिच्या सासऱ्याला ||
हाक मारीते कौसल्याला ग तिच्या सासूला |
सीता गेलीय वारूळे तळेला सोनु कंबळायला ||
हाक मारीते लक्ष्मणाला ग तिच्या दिराला |
हाक मारीते रामयाला गं तिच्या नवऱ्याला ||
सीता गेलीय वारूळे सोनु कंबळायला ||

 आदिवासी संस्कृतीत रामायण रूजलेले आहे. हे या गीतातून उलगडते. नावे बदलून पुनरुत्पत्ती हे वैशिष्ट्य येथे दिसते. त्याचप्रमाणे कौटुंबिक नात्याला सांसू, सासरा, दीर आणि शेवटी लाजत नवऱ्याच्या उल्लेखाला या गीतात प्राधान्य आहे. रामायणातील सीता वारूळ नावाच्या पांड्यावरील एका तळ्यात कमळे आणायला गेली ही कल्पना यात असून, सीता आपला सासरा दशरथ, सासू कौसल्या, दीर-लक्ष्मण आणि नवरा- राम यांना हाक मारीते. एवढीच कल्पना या गीतात आहे. येथे सोनू हे गाणे गाणारीच्या मैत्रिणीचे नावं आहे. आदिवासी गीतात आपले गाव आणि आप्त यांची नावे गोवायला कायम वाव असतो.

 जंगल

जंगल जंगल जंगल गं आई जंगलं गं
जंगलाच्या मध्ये मला दिलय गं.. ||

पायातले पैंजण केले न ग सीता केले न ग

७२