पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डोक्याला केसांचा अंबाडा, बुचडा किंवा चक्कर घालून त्यावर काळी जाळी बांधतात. विपुल क्लिपांनी हेअरपींन्सनी केस घट्ट बांधून बसवितात. केसांना चाफा, आगरा, गुलाब, झेंडू मिळेल ती रान फुले पाने 'पत्रं पुष्यंम' लेवून त्या सजवतात, भडक रंगीबेरंगी रिवीन्स आवडीने लावतात. तसेच भडक रंगाचे कपडे करून आपापल्या पाड्यांतील माणसात मिसळून वाजत गाजत चालत गात नाचत येतात.

 पुरुषांप्रमाणे स्त्रीयांचेही सीमोलंघन असते. पुरुष मात्र नेहमीप्रमाणेच दसरा हा मोठा सण असूनही त्यादिवशी लंगोटी, फडकी फार तर हल्ली अर्धी चड्डी घातलेले असतात. डोक्याला असते गुंडासे अथवा टोपी आणि असलीच तर अंगात बंडी, सदरा, अथवा नुसते बनीयनच, पण आनंदाला नसतो तोटा. ते आपल्या जव्हारच्या आवडत्या राजा महाराजांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी चालत जात असतात. थकवा विसरण्यासाठी त्यांनी जरूर मथ प्राशन केलेले असते. त्यात स्त्रियाही मागे रहात-माहीत. सगळ्यांचे डोळे लाल, मयाच्या नशेमध्ये राजाच्या पायावरडोके ठेवण्यासाठी भरजरी पोषाखातील नंगी तलवार घेऊन राजबिंडा राजा पाहण्यासाठी त्याला अभिवादन करण्यासाठी मुजयासाठी, समाजासाठी ही दसन्याची प्रथा रुढ आहे. संपूर्ण जव्हारमध्ये दसन्याच्या दिवशी सकाळपासून ही शोभा यात्रा पाहायला मिळते. आदिवासींचे तांडेच्या तांडे फुलून बहरून रात्रंदिवस नाचनाचून, तारपा ढोल वाजवून सोंग घेऊन चालत असतात. निदान दसऱ्याच्या दिवशी तरी आपल्या व्यथेचे, दारिद्रयाचे त्यांना स्मरण होत नाही. ते सगळे विसरतात. स्वतःलाही विसरतात.

 हनुमान पाँईटला भव्य यात्रेचे स्वरूप येते. सगळ्या नद्या सागराला तशा सगळ्या वाटा आणि आदिवासींचे जथे हनुमान पाँईंटला येऊन मिळतात. शेवटी कार्यक्रम असतो रावण दहनाचा एक भला मोठा चिंध्यांचा रावण केला जातो.

त्याला असंख्य आदिवासी बंधू भगिनीच्या आणि समस्त जव्हारकर नागरिकांच्या साक्षीने भडाग्नी दिला जातो. रावण अवाढव्य बनवतात. तो पूर्ण जळेपर्यंत सगळेउभे थांबतात. रावण दहन झाले की सगळे दमून थकून तरीही पुन्हा वाजत गाजतनाचत, ढोल टिपच्या तारपाच्या धुंदीत घरोघर परततात, आपठ्यांची पाने वाटतात.दुख पचवून सगळ्यांना आनंद देतात.

७०