पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तारपानृत्या बरोबरच ढोल नाचही सादर केला जातो. आदिवासींच्या मधील ठाकूर जमात हा नाच जास्ती करून सादर करतात. या नाचात विशिष्ट तालावर ढोल वाजविला जातो. नाचणाऱ्यांच्या एका हातापायात घुंगरु बांधलेले असते. मोठ्या उत्साहात बेहोष होऊन नाचा ढोलाच्या तालावर नाचतो. ढोलाच्या ठेक्यावर विशिष्ट लयीत नाचणारा ढोलावर उलथे पालथे होऊन नाचत असतो. नव्हे धडाधड आदळत असंतो. नाचता नाचता त्यात पिरॅमिडसही तयार केले जातात. एखाद्या दहीहंडीची आठवण व्हावी असे ते सारे खेळ असतात. घुंगरु आणि ढोल यांच्या नादात सारे जण त्यांचे सारे विश्वच जणू घामाने डबडबून जाते. त्याचवेळी तोंडाने गाणी म्हटली जातात. पण त्या गाण्यांचे बोल ढोल घुंगरु पायांच्या आवाजात लोपून जातात. नुसता लयीतला ध्वनी ऐकू येत राहतो.

 जव्हारचा दसरा हा आदिवासींच्या दसरा साजरा करण्याच्या पध्दतीतील आणखी एक्क विलक्षण बहारदार अनुभव आहे, जव्हारचा दसरा हे साच्या महाराष्ट्राचे आणि आदिवासी परिसराचे आकर्षण आहे. एका विशिष्ट पध्दतीने परंपरेने चालत आलेल्या रीतीरिवाजाने हा दसरा सण साजरा होतो. खेडोपाडीचे आदिवासी, मग त्यात ठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या आठही प्रमुख उपजाती आढळतील. त्या एकत्र येऊन दसरा साजरा करतात. त्यात महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, क. ठाकूर, म. ठाकूर, वारली, कोकणी, कातकरी, इत्यादी विविध जमातीच्या लोकांचा समावेश असतो.

 सगळे एकाच जव्हारच्या हनुमान पॉईंटच्या दिशेने वाट चालू लागतात.आपल्या अति ग्रामीण अगदी आतल्या खेड्यापाड्यातून कित्येक मैल जंगलातली खडकाळ, डोंगर दऱ्यातली बिकट वाट पायी तेही अनवाणी तुडवत हे सारे आदिवासीपायी चालत आलेले असतात. तहान भूक विसरुन नाचत नाचत वाजत गाजत सगळे आदिवासी येतात आणि सगळे रस्ते आणि दिशा फुलून येतात. तारपा ढोल, घुंगरू यांच्या आवाजाने नादब्रह्मात सारे लीन होतात. ब्रह्मानंदी टाळी लागते. आदिवासी स्त्रीयांना मूळातच नटण्याची साजशक्रंगार करायची विलक्षण हौस असते. सोन्याचांदीच्या नसल्या तरी रुप्याच्या वाक्यानी, पितळी लोखेंडी दागिन्यांनी त्या नटलेल्या असतात. गळ्यात रंगीबेरंगी मण्यांच्या माळा घालतात.

६९