पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दसरा : जव्हारच्या आदिवासींचा !


 दसऱ्याच्या दिवशी आदिवासी लोक खूप आनंदात बुडून जातात. 'दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा' याचा प्रत्यय येतो. दसयाच्या सुमारास आदिवासी लोकांचे शेतातील पीक, पिकावर भरास आलेले असते. शेतातील पीक गोळा करता करताच आदिवासी लोकांचा आनंदाचा सण 1दसरा2 जवळ आलेला असतोच.

 

घटस्थापना झाली की पहिली माळ चढते. तिथून आदिवासी लोकांमध्ये

घरातील मुख्य माणूस दसरा येईपर्यंत पथ्य पाळीत असतात. उपवास धरत असतात. ज्या काही वस्तूंची पथ्ये पाळली जातात त्यात काकडी, डांगर, सफेत खेकड़ा, दोडा या वस्तूंचा समावेश होतो. या वस्तू ते या कालावधीत खात नाहीत.

 अंबा देवीला शेवटची माळ चंदली की त्या दिवशी सर्व घरातील देवाची पूजा केली जाते. उपत्रास सोडतात. मग मात्र काकडी, डांगर, सफेत खेकडा, दोडा या वस्तू खायला सुरुवात करतात.

 दसऱ्याच्या दिवशी आदिवासी लोकांची मुख्य हत्यारांची पूजा केली जाते. दसऱ्याचा दिवस शुभ आणि चांगला मानला जातो. म्हणून आदिवासी लोक सर्व काही करत असतात.

 आदिवासी लोकांना दसयाची आनंद पर्वणी म्हणजे त्यांचे आवडते तारपानृत्य, या तारपा नृत्यानें ते धुंद होतात. आनंदाच्या डोहात डुंबतात, तल्लीन होतात. यावरून या नादलयात दुःख पचवून तरंगणाऱ्या आदिवासींच्या नृत्यकला प्रेमाची : साक्ष पटते. आदिवासींचा दसरा एक विशिष्ट ठिकाणी साजरा करण्याची पध्दती आहे. त्या ठिकांणी सर्वजण आपले तारपानृत्य बरोबर घेऊन मेळावा भरवितात आणि रात्रंदिवस त्याच आनंदात नाचत राहतात. हे तारपानृत्य दसयापासून

सुरू होते आणि थेट पुढं दिवाळीपर्यंत चालू राहते.

६८