Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पध्दतीचीच, त्या जुन्याच वळणाची त्याच परिचित आदिवासी बोलीतील पण ती कथा आता असेल व्यसन मुक्तीची, विज्ञान निष्ठेची, स्त्री पुरुष समानतेची, पर्यावरण रक्षणाची, सुशिक्षणाची, सुसंस्काराची आणि कुटुंबकल्याणाची.

 अंधश्रध्दा निवारण करून अडाणीपणा नाहीसा करून अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, मनोरंजन या मूलभूत गरजा भागविण्याची दिशा दाखविणारी ही कथा असेल. अशा कथेने मग आमच्या आदिवासी बांधवांचे जीवनमान आणि राहणीमान उंचावेल, अशी आहे आदिवासींच्या थाळगानची कथा. एखाद्या जाणकार कलाकारांनी थाळगान ऐकून तृप्त व्हावे आणि थाळगान या माध्यमाचा लोकप्रबोधनासाठी मनसोक्त वापर करावा. थाळगानाला स्टेज लागत नाही. फक्त. मंडळी एकत्र जमली आणि थाळगान गाणारा कथेकरी मध्यभागी बसला, एक थाळा, मेणाची गोळी आणि तागाची काडी शोधली की रात्र जागवणारे मंत्रमुग्ध करणारे थाळगान सुरू होते.

 आदिवासी क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी थाळगान कथा पध्दती शिकून जर आधुनिक समाज प्रबोधनाच्या गीतात कथा लावल्या तर आदिवासींचे थाळगान

आदिवासींच्या उन्नतीला पोषक होईल याची खात्री आहे.

६७