पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 घरातील पीठ मळण्याची कोणतीही एक थाळी घ्यायची, जेवणाची घेतली तरी चालेल. ती थाळी बसून मांडीमध्ये धरावयाची किंवा मांडीवर ठेवायची, थाळीच्या मध्यभागी मधाच्या पोळ्याचे थोडे मेण घेवून त्याची गोळी चिकटवायची. त्यागोळीमध्ये आपण दोरी बळण्यासाठी जो तागा वापरतो. तो तागा ज्यापासून मिळतो अशी तागाची काडी (सनकाडी) ती रोवायची त्यानंतर अंगठा आणि तर्जनी यांच्या सहाय्याने दोन्ही हातांनी काडीच्या वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत काडी धरुन सतत फेन्या मारावयाच्या त्याचा परिणाम म्हमजे त्या थाळीतून एक सुरेख झंकार निनादतो. त्याला मंत्रमुग्ध करून टाकणारी एक लय आणि नाद लाभतो. त्या नादाच्या धुंदीमध्ये आणि थाळीच्या झंकारामध्ये नादात " नाद आणि सूरात सूर मिसळून एक चांगली मनावर बिंबेल अशी पुराणप्रिय कथा लोकभाषेत कथेकरी सांगतो किंबहुना गातो, हेच थाळगान होय.

 हा कथेकरी म्हणजे निरक्षर, पण जाणकार आदिवासीच असून, त्याच्या या कथा केवळ ऐकून परंपरेने चालत आलेल्या आणि श्रध्देने जतन केलेल्या असतात. त्याची भाषाही त्या त्या भागातील आदिवासी बोलीच असते. कथा सांगायला आरंभ अगदी हलक्या आवाजात आणि धीमेपणाने होत असला तरी पाहता पाहता कथा श्रवणकरणाऱ्यांना गुंगुवून टाकते.

 या कथेला पुन्हा काळवेळ मर्यादा काही नसते. एकदा रात्रीचे थाळगान सुरू झाले की थांबवायचे ठरवले तरच थांबते. आदिवासी बोलीभाषेत ही कथा सांगितली जात असल्याने आदिवासी बांधवांना कथा समजत नाही हा प्रश्नच उरत नाही.

 असे हे लोकशिक्षणासाठीही वापरता येण्याजोगे थाळगान एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. लोककला आणि लोकशिक्षण यांच्या समन्वयातून लोक प्रचार उत्तर रीतीने साधता येईल याची खात्री या कथेने पटते.

नव्या युगातही प्रभावी :
 आता नव्या काळाच्या संदर्भात थाळगान हे माध्यम वापरावयाचे ! लोकांना

एकत्र गोळा करून थाळी मांडीवर घेवून कथा लावायची ही कथा असेल पुराण

६६