या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आपल्या वस्तीवर परतल्यानंतर काहीच मार्ग उरत नाहीत म्हणूनच या एकत्रीकरणातून तरी विवाह जुळून आणावेत असा प्रयत्न स्वाभाविक वाटतो.
डोक्याला प्रथम जखम करुन घेणारी व्यक्ती यांना एक खास वनस्पती औषधी माहिती असते की ज्यामुळे ते आपला घाव दोन तीन दिवसात बरा करतात.
दारूच्या देवाण घेवाणीचा प्रकार आणि वीरांचे रक्तबंभाळ होणे या दोन गोष्टी वगळल्यास या प्रथेचे निश्चितच उदात्तीकरण होवू शकते. त्यातील सद्हेतूही
स्पष्ट होतो.
आदिवासींच्या या प्रथा नेमक्या किती वर्षांपासून सुरू आहेत व त्यांचे मूळ स्वरूप असेच होते का? या प्रश्नांचा शोध घेतल्यास अधिक काही हाती लागेल.
६४