पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मृतात्म्याला आवाहन देतो. केवळ लंगोटी लावलेले संपूर्ण उघडे असे वीर काही ठराविक आलेले काळसर रंगाच्या तलवारी हातात घेवून त्या ठिकाणी,उभे राहिलेले होते. त्यांनी त्यांच्या जवळच्या खंजीराच्या वाराने आपले मस्तकरक्ताच्या चिळकांड्या उडाल्या त्यांचे रक्त मानेवर पोटावर छातीवर ओघळलेले दिसत होते आणि तरीही माणसे हू की चूं न करता आपापसात बोलत होती, भेटत होती. आणि हिंडत होती. या कार्यक्रमाबरोबरच प्रत्येक गटातील त्या दोन माणसांच्या अंगात मृताच्या संचार झाला. ते सर्वांगाने थरथरू लागले. मूठ आपटू लागले आणि बायका आपला मृतात्मा त्यांच्यात संचारला असल्याच्या कल्पनेने नमस्कार करू लागल्या. कडकडून भेटू लागल्या. पोहे आणि वरई त्यांच्या कपाळी लावत होत्या, भेटी घेत होत्या.

 तो अंगात आलेला माणूसही प्रत्येक नातेवाईकाला ओळखून जवळ घेवू लागला व दसऱ्याच्या शिलांगण सोहळ्याप्रमाणे वयाच्या भेदाचा विचार न करता ते. एकमेकास अलिंगन देतात. ते पाहता पाहता रडण्याचा भयानक आक्रोश मावळतो आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. गाठोड्यातील सर्व वस्तू, तेल, दिवा, तांब्या, पितळेचे काही दागिने इत्यादी त्या अंगात संचारलेल्या मृतात्म्याला दिले जातात.

 तो अंगात आलेला भाव मूठ वळवून पायाची मांडी घालून बसतो. त्याला सगळे मिळून ताठ बसवतांना पायांना हालचाली देतात. त्यानंतर पूर्ववत ते माणसासारखे होतात.

 हे काज एवढ्यावरच संपत नाही तर त्याठिकाणी काही पोक्त समजुतदार माणसे मृताच्या पत्नीला किंवा विधुराला भावी आयुष्यात उभे करण्याच्या दृष्टीने बाजूला घेवून बोलणी करतात. असेही ऐकायला मिळाले की काही वेळा जिथल्या तिथे जोडी निश्चित होवून पुन्हा उध्वस्त संसार उभारण्याला सुरुवात होते. लग्न जमते पण प्रत्यक्षात हा प्रकार आमच्या निदर्शनास आला नाही मात्र त्या एकत्र

येण्यामागे तोही एक हेतू असावा हे जाणवले.

६३