पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सामुदायिक श्राध्दाची एक थोर आणि उदात्त प्रथा आदिवासींमध्ये रूजली असावी, त्यातला काही थरारक भाग वगळल्यास, ही प्रथा अनुकरणीय आहे यात शंका नाही.
समारंभ की सोहळा :
 मोठ्या मांडवात हिरव्यागार बांबूंचा एक छोटा भांडव घातलेला असतो. त्या मांडवावर जे गवंत असते त्याला काजावे गवत असे म्हटले जात असावे. या छोट्या मांडवांत साळ, वरई अशा धान्यांचे छोटे ढीग केले होते. एका कोपयात एक टोपली होती आणि त्या टोपलीत आदिवासींचा देव ठेवलेला होता. तो देव म्हणजे बहुधा हिरवा, बहिरोबा असावा तिथे काही लहान मोठ्या आकाराचे पिंड ठेवलेले होते. ते पिंड भाताचे नसून मातीचे होते. त्याच्या भोवताली वेगवेगळ्या प्रकारचा .आवाज देणारी वाद्ये घेवून, वाजविणारी माणसे बसली होती. सुरुवातीला शंख फुंकले गेले, भजन म्हटले, टाळ वाजवले पण त्या रडण्याच्या एकच हलकल्लोळात शंखाच्या आवाजापलिकडे त्या गाणाऱ्याच्या गाण्यातला शब्दही कळत नव्हता.

 प्रत्येक मृताच्या गटाबरोबर कमीत कमी एक बीर ढोलवाला अशी दोन माणसे ज्यांच्या अंगात नेहमीच वारे संचारीत अशी आणलेली होती. त्यांना भावे म्हणतात. मृतांच्या नातेवाईकांनी फार अगोदरच सुपारी देवून त्यांना आणलेले असते. आणखी विशेष म्हणजे हे भावे अनोळखी असतात व मृतात्म्यांच्या अंगात संचार झाल्यावर अचूकपणे गर्दीतून ते मृतात्म्यांच्या नातेवाईकांना हेरतात.

 पाहता पाहता ढोलवाल्यांची संख्या व आवाज भरपूर वाढला. वातावरण निर्माण झाले. द्रुतगतीने सगळ्या हालचाली होवू लागल्या. मोहाच्या दारूचा भपकारा आसमंतात आणि मांडवात दरवळत होता. त्यावरून कित्येकांनी समारंभपूर्वक दारू घेतलेली होती याची कल्पना आली आणि ती धुंदी त्यातूनच निर्माण झालेली होती.

 भर दुपारी तीनच्या सुमारास कांबळी, कांवळी म्हणजे श्राध्दाचे मंत्र म्हणणारा

तो पुरोहित ! भिक्षुकी तो आदिवासींच्याच बोलीभाषेतून मंत्रोपचार करून

६२