रुपये खर्च करून काज घालायचा आहे. त्याच्या पाड्यावरती रात्रीच्या वेळी ढोल
बाजविला जातो. म्हणजे निरोप न देता, निमंत्रणे न पाठविता. सर्वांनी
समजावयाचे, की त्या पाड्यात यंदा काज आहे.
प्रत्येक आदिवासींच्या उपजातीचे काज स्वतंत्रपणे साजरे होते. आम्ही गेलो
होतो त्या हिरडपाड्यावर क ठाकूरांचे काज होते. या वर्ष सहा महिन्यात ज्यांच्या
ज्यांच्या घरी कुणी दिवंगत झाले असेल अशा सगळ्या लोकांनी मिळून एकत्र
येवून हे काज साजरे होते. त्याप्रमाणे त्या सूचना त्यांना ढोलाच्या विशिष्ट नादाने
आपोआप मिळालेल्या असतात. हे काज साधारणपणे दिवस दिड दिवस चालते :
म्हणजे २७ ऑक्टोबरलाच हे लोक येवून द्राखल झाले होते. भर दुपारपासूनच
रात्रभर काही न खाता उपाशी राहून सगळेच संमदुःखी मृताला द्यावयाच्या वस्तूंचे
गाठोडे कवटाळून, धाय मोकलून रडत राहिलेले होते. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी
म्हणजे २८ ऑक्टोबरला हा कार्यक्रम आटोपला. वारली समाजात पाच दिवस
उपवास करण्याची प्रथा आहे. असे समजते.
श्राध्दात रडणे :
दुपारी रडून रडून त्यांच्या डोळ्यातील पाणी आटलेले दिसले आणि उपाशीपोटी
आवाजही बसलेले होते. तरीही आक्रंदन चालूच होते. काही घोळक्यात "भोले
घातले रडाया" अशीही स्थिती होती. सहाजिकच मृतात्मे निघून जावून बरेच
दिवस झालेले आहेत. भावनांची तीव्रता कमी झालेली आहे. आणि तरीही या
ठरलेल्या दिवशी सगळे हा समारंभ करीत आहेत. त्यामुळे मंडपभर चार पाचशे
माणसे नुसती आक्रंदन करीत होती. इकडे ढोल गतीने वाजत होता. डोक्यात
लख्खकन प्रकाश पडला. हे तर सामुदायिक श्राध्द आहे. सामुदायिक विवाह,
सामुदायिक व्रतबंध, जसे साजरे होतात तसेच मृतांचे विधिवार न पाहता, ठरलेल्या
दिवशी सर्वांनी मिळून एकत्र येवून, श्राध्द करण्याची पध्दत आहे.
थोडा विचार केला. तेव्हा लक्षात आले ह्याच्या मुळाशी कदाचित
आदिवासींची गरिबीही कारणीभूत असेल. प्रत्येकाला ब्राम्हण बोलावणे, तांदळाचे
पीठ घालणे आणि जेवणावळी उठवणे हे कसे शक्य होणार? म्हणून सोप्या पध्दतीत