पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आदिवासींचे काज


 दिवाळीनंतर अचानक आलेल्या निरोपामुळे प्रसिध्द गीतकार अंशोक जी. . परांजपे व श्री. नानासाहेब मेटकर यांच्यासह, जामसर जवळच्या हिरडपाड्याला जाण्याचा योग आला. तिथे गेल्यावर मला प्रथम वाटले की हिरपाड्यावर आज एखादी यात्राच आहे कारण अनेक आदिवासी स्त्रीया उत्साहाने सजून आलेल्या दिसल्या. अनेक दुकानेही लागलेली होती.

अनावर रडणे:

 आम्ही मांडवांच्या दिशेने आणखी थोडे पुढे गेलो. सुरुवातीला मला काहीच बोध होईना. त्या ठिकाणी आठ आठ दहा दहा बायकांचे घोळके स्वतंत्रपणे बसले होते. त्यातील एका बाईच्या मांडीवर, कापडात गुंडाळेलेले गाठोडे ठेवलेले होते. 'बायकारडत होत्या. रडत रडत मृतात्म्याला साद घालीत होत्या. सगळीकडे नजर फिरवली. तर अशी जवळ जवळ तीस पंचवीस टोळकी त्या मांडवात बसलेली होती. नवीन येणारे नातेवाईक आपापल्या टोळ्यात सामील होत होते. आणि रडायला साथ देत होते. त्यामुळे दुःखाची भावना दरवेळी उफाळून येई आणि तेवढ्या : पुरती त्याची तीव्रता वाढे. याचे पार्श्वसंगीतही शोकानुभव गडद करणारे । होते. काही घोळक्यांमध्ये भेदरलेली लहान मुले दिसत होती.

'काजा' ची कल्पना:

 दहापंधरा ढोलबाले ढोल घेवून विशिष्ट प्रकारे वाजवित होते. हे ढोल वाजविण्याचे भिन्न प्रकार होते. ते ढोल वाजविण्याचे भिन्न प्रकार आदिवासींमध्ये आहेत असे समजले. वारलीच्या काजात मात्र 'डाका' हे वाद्य दोन्ही बाजूला निमुळते होत जाणारे आणि गुडग्यावर घेवून वाजविण्याचे असते. ढोल हा देवाकार्याचा भिन्नप्रकारे वाजतो, काजासारख्या श्राध्दाच्या समारंभाच्या वेळी वेगळा वाजविला जातो.

तपशीलात जावून चौकशी केली तेव्हा कळले, की दिवाळीनंतर येणाऱ्या पहिल्या शनिवारी ज्या कुणाला त्यातल्या श्रीमंत आदिवासीला, हजार दोन हजार

६०