पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मान आणि हक्क प्रस्थापित झालेला असतो. पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही सोंगं त्याच कुळातली माणसे पुढे चालवितात.

 बोहाडा केला नाही तर भुताटकी किंवा अन्य काही तरी त्रास गावाला सुरू होतो, या समजुतीने हमखास बोहाडा करून आनंदोत्सव साजरा होतो आणि मनातील अरिष्ट आणि अनिष्ट संदेह गळून पडतात. सर्व मंगल मांगल्याचे पवित्र वातावरण गावात बोहाड्याने निर्माण होते. असा हा आदिवासींच्या संस्कृतीचा आणि सांस्कतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे हा बोहाडा उत्सव.