पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जिल्हा पातळीवर, त्यानंतर राज्यपातळीवर अशी ही आदिवासी साहित्याची चळवळ उभी राहिली पाहिजे. त्याची गती वाढवणे हे लेखकाचे, कलावंतांचे, समाजाचे कार्य आहे. मग मोठे मेळावे व संमेलन घेता येईल.

 आज आदिवासी साहित्य उपलब्ध नाही म्हणून ते पाठ्यपुस्तकात समाविष्ट होत नाही, आणि प्रकाशित होत नाही. म्हणून हे साहित्य प्रकाशित झाले पाहिजे. यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. आदिवासी साहित्याचा शोध घेतला पाहिजे .. आणि वनवासी साहित्य प्रकाशित केले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या राजकारणाशी संबंध न ठेवता केवळ आदिवासी सांस्कृतिक कार्य म्हणून हे मराठी, साहित्य संमेलन, महाराष्ट्र राज्य पातळीवर आपल्याला निश्चितच भरविता येईल. 000