पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आदिवासी सांस्कृतिक जीवनाचा अमोल ठेका : बोहाडा


 आदिवासींमध्ये शिमगा, दिवाळी, आखाती (अक्षय्यतृतीया),दसरा, कवळी 'भाजी, पोळा, नागपंचमी, बीजा इत्यादी सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे करण्याची प्रथा आहे. या सणांमधून आदिवासींची संस्कृती प्रकट होते. 'बोहाडा' या उत्सवाचे सर्वात जास्त महत्त्व आणि आकर्षण आदिवासी बांधवांमध्ये आहे असे जाणवते. जव्हारचे उदाहरण जरी पाहिले तरी या तालुक्यातील भरसटमेट, . मोखाडा, नांगरमोडा, चामीलपाडा, बिवलधार, पिपरपाडा, वांगणपाडा, कापरीचा .. पाडा, नंदनमाळ, डुबीचा पाडा, शिवाकोरड्याची भेट, विनवल, बोराळहारी; वडपाडा, जामसर, सारसून, उंबरविहीर, वेलीचा पाडा, साखरा, झाप, नांदगाव, .. . पवारपाडा, इत्यादी पाड्यांवर बोहाडा होतो याचा अर्थ सगळ्याच पाडयांवर बोहाडा होतो. एवढे या बोहाड्याचे आदिवासी जीवनात आणि संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे.

 होळी पौर्णिमा आणि धूलिवंदन आटोपले की गावोगाव हा बोहाडा क्रमाने सुरू होतो. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार था फक्त ५ वारांमध्येच बोहाडा कार्यक्रम साजरा होतो. शुक्रवारी- शनिवारी लहान सोंग काढतात. सोमवारी-रविवारी मोठी व सगळी सोंगे काढतात म्हणजे ही विविध देवाची मुखवटे घालून घेतलेली सोंगे नाचवितात. बोहाडा म्हणजे देवी जगदंबेचा उत्सव या दिवशी अनेक देवांची ४१ सोंगे नाचवतात. सोमवारी प्रत्येक सोंगासमोर नारळ फोडावा लागतो. सोंग या वेळी नर्तनात दंग असते. या सोंगांमध्ये आंबापालवी गणपती, सारजा, लोढे, शिवाजी, राक्षस, मासा,महादेव, रामतारी, - (डोक्यावर ताटी घेतलेली असते व त्या ताटीत मुखवटे बसविलेले असतात.) सायदेव, इंद्रदेव, पुंडलिक, झकारी ताटी, बम्भूदेव (ब्रम्हदेव) सरवाई, होरा (मूर्ती) भिलीन, ताटी, कृष्ण देव, करणीदेव,गवळ, ताटी कासव, वाघोबा, विष्णुदेव, भीम, विमान, अंबादास ताटी, चारण, खंडेराव, बहिरोबा, काळूला, पांडव ताटी, टोप वेताळा राक्षण, चंद्र, सूर्य, राजा, नरसिंह, देवी, अशी ही अनेकविध सोंगे असतात.

५६