पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आदिवासी साहित्य संवर्धन : काही विचार


आदिवासी साहित्य चळवळ अधिक तीव्र होण्याची गरज :-
 महाराष्ट्रामध्ये आदिवासी साहित्यिक उदयाला येत आहेत. त्यातील काही लेखक म्हणून सुप्रतिष्ठितही झाले आहेत. या साहित्याच्या निर्मितीकडे अभ्यासक समीक्षकांचे लक्ष वेधले जावू लागले आहे .

 महाराष्ट्रापुरता आदिवासी भागाचा विचार केला तर नागपूरातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, ठाणे जिल्ह्यातील पालघर, वाडा, जव्हार, विक्रमगड, मोखाडा, खोडाळा, नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, बागलाण (सटाणा) कळवण, काही प्रमाणात मालेगांव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, हरसूल हा भाग आदिवासी म्हणून गणला जातो. परंतु तसे पाहिले तर शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने, प्रशिक्षणाच्या निमित्ताने, स्वयंसेवी संस्थेतील कामाच्या निमित्ताने आज आदिवासी बंधू-भगिनी पुणे, नागपूर, औरंगाबाद, ठाणे, कोल्हापूर या सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये येवून स्थायिक झाले आहेत. परंतु आज असे लक्षात येते की, या आदिवासी बांधवांमध्ये आता नगरवासीय बनलेल्यांमध्ये जाणीव जागृतीची आवश्यकता आहे. त्यांचे त्या त्या ठिकाणी एकत्रिकरण करून आदिवासींच्या हितांचे काही नवनवीन उपक्रम राबविण्याची गरज आहे. त्यातला आदिवासी साहित्य चळवळ हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. . . .

आदिवासी लोकसाहित्यांचे जतन व्हावे : -

 लोकसाहित्य ही आपली, तसे पाहिले तर वेदकालीन अतिप्राचीन साहित्य निर्मिती आहे. ज्यावेळी लिखित स्वरूपात काहीही उपलब्ध नव्हते, त्या काळान केवळ गेय, सुस्वरात, तालात म्हणता येईल व कानाला गोड वाटेल अमेत्र केवळ तोंडी मौखिक स्वरूपातील साहित्य निर्माण झालेले आहे. आज आपण आदिवामी भागातील या लोकसाहित्याचे संशोधन, संकलन, मूल्यमापन त्यावरील भाष्याम:प्रकाशित केले पाहिजे.

५३