पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अ. वनवासींचे साहित्य आणि त्यांच्या विविध कला विकसित होण्यासाठी, त्या साहित्य कलांना चालना देण्यासाठी शासनाच्या, शासनेतर स्वयंसेवींच्या माध्यमातून अधिक प्रयत्न करता येतील. त्यासाठी पुढील गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे.
१. लिखाण करणाऱ्या नवशिक्षित वनवासी साहित्यिकांना उत्तेजन देणारे व्यासपीठ निर्माण करावे.
२. चनवासी साहित्यिकांचे मेळावे जिल्हावार भरवावेत. नांदेड, ठाणे, नाशिक,धुळे, अमरावती, चंद्रपूर, नगर, नागपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचा त्यात प्रामुख्याने समावेश असावा. ३. वनवासी साहित्यिकांच्यासाठी लेखक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, त्यामध्ये कथालेखन नाट्यलेखन, लोकसाहित्य सदृश लेखन, कादंबरी - आत्मचरित्र लेखन, समीक्षा लेखन इत्यादी शिबिरे आयोजित करावीत.
४. कथासंग्रह, आत्मचरित्र, नाटक, कादंबरी, वैचारिक इत्यादी स्वरुपाचेवनवासींचे साहित्य प्रकाशित केले जावे.
५. वनवासी साहित्यिकांना साहित्य प्रकाशनार्थ व वनवासी विषयक नियतकालिके चालविणाऱ्या संस्थांना विशेष अनुदान यावे.
६. ग्रंथ पुरस्कार देतांना उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा वनवासी लेखकांना स्वतंत्र पुरस्कार धावा.

७. वनवासी लोकसाहित्याचे आमूलाग्र संशोधन होणे नितांत गरजेचे आहे. - त्यासाठी अशा संशोधकांना क्षेत्रीय अभ्यास करण्यासाठी व झालेले संशोधन प्रसिध्द करण्यासाठी एकूण कालावधीत पाठ्यवृत्ती (स्कॉलरशीप) शिष्यवृत्ती देण्याची तरतूद करावी. ती खर्चासह दरमहा पाच हजार रुपयेपर्यंत असावी. त्यात वनवासी बोलींचा अद्याप राहिलेला अभ्यास होईल. वारली, 'क' ठाकूर, - 'म' ठाकूर, कोकणा, ढोरकोळी, याप्रकारच्या बोलींप्रमाणेच एकेका .. जातीचाही सविस्तर अभ्यास करण्याजोगा आहे. निर्मिती, दैनंदिन आचारविचार, जीवनमान, राहणीमान परंपरा इत्यादींच्या अनुषंगाने हा अभ्यास होऊ शकेल. त्यामुळे संस्कृती उलगडेल. आदिवासी लोकसाहित्याचे संकलन विश्लेषण, मूल्यमापन, यात आदिवासींच्या म्हणी, वाकप्रचार, कुटे, लोककथा, लोकगीते, आदिवासींचे सण वार उत्सव, लोकभ्रम, लोकरुढी,

४९