पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्रध्दा, अंधश्रध्दा, परंपरा तंत्रमंत्र. यासह लोकनृत्ये, लोकवाद्ये, लोकवैद्यक, वनौषधी, वनवासींची चित्रकला, वारली पेंटींग्ज, वनवासी क्रीडा, मुखवटेकला, झाडांपासून रंगनिर्मितीची कला इत्यादी अनेक विषय वनवासी लोकविद्या आणि वनवासी साहित्यात येतात.
८. वनबासींच्या विविध कलांच्या आविष्काराला मुक्त संधी मिळावी यासाठी चित्रप्रदर्शने, लोककला उत्सव, लोकसाहित्य संमेलने यांना उत्तेजन द्यावे. मुंबईच्या जहांगिर आर्ट गॅलरीसारखे वनवासी लोकमंच (रिक्रिएशन हॉल)उभारले जावेत.
९. वनवासी संदर्भातील ग्रंथ, शाळा महाविद्यालयांमध्ये ग्रंथालय वाचकांसउपलब्ध असावेत. अशा ग्रंथांची यादीही देता येईल.
१०. विद्यार्थ्यांसाठी शासन तयार करीत असलेल्या बालभारती पाठ्यपुस्तकात . वनवासींना आपले वाटणारे विषय आणि त्यांचे सण, उत्सव, गाणी, कला इत्यादींचा समावेश किमान असावा.
११. वनवासी नियतकालिकांना अनुदान तर धावेच पण त्याचबरोबर ती वाचनालये-ग्रंथालये यांना घेण्यास भाग पाडावे.
१२. संगीतकलेची, शिल्पकलेची, चित्रकलेप्रमाणेच वनवासींना आवड आहे.म्हणून चित्रकला-संगीतकला, शिल्पकला यांचे शास्त्रशुध्द शिक्षण अतिग्रामीण भागात जाऊन देण्याची शिबिरे भरवून व्यवस्था व्हावी.

 वनवासींच्या या सर्वच साहित्य आणि कलांमध्ये वनवासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या. समाजाचे उत्तम त-हेने प्रतिबिंब उमटलेले आहे. त्यातून वनवासींची प्रज्ञा-प्रतिभा-विज्ञाननिष्ठा-पर्यावरण शास्त्राचे भान, कलासक्ती-निसर्गप्रेम इत्यादी सारे काही स्पष्ट होते.

 आजच्या संगणकाच्या, एकविसाव्या शतकाकडे झेपावणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या युगात वनवासींची लोककला, संस्कृती साहित्यकला आणि भाषा जतन केली पाहिजे. हजारो वर्षांची ही सांस्कृतिक मूल्यपरंपरा जतन करणे कर्तव्य आहे. अन्यथा वनवासी बांधव आपल्यापासून दुरावतील. त्यासाठी वनवासी लोकसंस्कृती, लोककला.आणि लोकसाहित्याच्या संदर्भात जनजागरण घडविणे