लोकसाहित्यांच्या शब्दविष्कारात म्हणी, उखाणे, कूटे, लोकसमजुती यांचा आवर्जून समावेश करावा लागतो. त्यातील वास्तव, परिस्थितीवर झगझगीत प्रकाश टाकणारे आहे. त्यांचे मोल पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीनेही विशेष आहे. उदाहरणार्थ 'झाड तठ वारा... पडती पाण्याच्या धारा', 'तण .... खाई धन', 'जळो ... गग पिको', 'मडक्यात दाणा त..... भील उताणा', 'फडका घे.... भडका घे सूट' (जगण्यासाठी एका फडक्याची आणि मडक्याची माणसाला गरज असते). 'लाज मरे तो भूखे मरे', 'निलाजन्याला मारला पिढा तं म्हणे. बसाय दिला', .. 'पोट हाय संग ... त... काय पडलं मागं', 'होळी जळाली न थंडी पळाली', 'ये ना भये..... अन.... घमेले घेऊन पय',.... 'काळी काठी तेल चाटी' (उत्तर : केस) 'तळ्याच्या काठी ठोकली, खिटी हालते, पण उपटतच नाही' (उत्तर : हात . व बोटे) सुके तळ्या पाखरे फडफडती' (उत्तर : लाह्या भाजणे) 'आरवत कोंबडा, तरंगत जाय... चार शिंगं ... दहा पाय' (उत्तर : नांगर, शेतकरी, दोन बैल, चार . 'शिंगे, दहा पाय असे नांगरधारीचे वर्णन आहे), 'काळी गाय ... काटे खाय .... पाण्याला पाहून उभी हाय' असा हा फार मोठा वास्तवाचा ठेवा लोककलेत आणि लोकसाहित्यात जतन केलेला आहे.
शृंगारातील रंगलेपणाची एक झलक पाहा....
'माही. बीजा, कोंबडी शिजा,
पोषा पोषांनो, उगाच निजा.'
गोडा दिवस, मोडा दिवस म्हणजे सोमवार मंगळवार, उगवती-मावळती म्हणजे पूर्व-पश्चिम दिशा अशी ही सरळ, सोपी वस्तुस्थितीनिदर्शक लोकपरिभाषा आहे. सारेच लोकवास्तव वेधक आहे.
बनवासी जीवनाच्या समृध्दीचे प्रतीक वनवासी कला आणि साहित्य निर्विवाद आहेतच. या दमदार आणि कसदार कला, साहित्य आणि संस्कृतीने वनवासी बांधवाला तहानभूक विसरून बेहोषीचे, धुंद, आनंदी जीवन जगायला शिकविलेले आहे. वनवासी साहित्य आणि कलांमध्ये त्यांच्या भावना, विचार व्यक्त झालेले आहेत, यासाठी पुढील गोष्टींचा विचार होणे अगत्याचे आहे.