पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काही प्रत्यक्ष भेटायला येतात अशी कल्पना आहे. आपापले वीर म्हणविणारे भगत मांत्रिक ओळखीने ज्याचे त्याने तेथे बोलावलेले असतात. गावोगावचे लोकसमूह म्हणून एकत्र येतात, अंगात वारे संचारल्यावर, त्या वीराच्या मदतीने, मृत . व्यक्तीला त्याच्या आवडी-निवडीच्या वस्तू भेट देऊन शोक प्रगट करायचा अशी पध्दत आहे.

 आत्यंतिक गरिबीमुळे तांदळाच्या भाताच्याऐवजी मातीचे पिंड तयार करतात. ते पिंडही सामूहिकच असतात. भात पिकविणाऱ्या आदिवासींना मृत व्यक्तींसाठी दान करायलाही भाताचे पिंड मिळू नयेत. मातीचे पिंड करावे लागावेत, यापेक्षा कठोर वास्तव कोणते अमू शकेल ?.

 एकाच भगताच्या मार्गदर्शनाने हे काज साजरे होते. त्यात तलवारीने वीर , आपल्या डोक्यात घाव घालून जखम करतात. त्या जखमेतील रक्त भळभळते ते पायाच्या अंगठ्यावर ठिपकून पडावे असा घाव तो वीर डोक्यात स्वतःच्या हातानेघालतो. पुन्हा एका दिवसात झाडपाला, वनौषधी लावून ती जखम संपूर्णपणे बरी . करण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे. तशी व्यवस्था आहे. एका दृष्टीने या प्रथेत :मानवी उदात्तता भरलेली आहे. कुटूंबाचे हे पुनर्वसन आहे. काज चालू असतांनाच विधवा झालेली स्त्री, पत्नी गमावलेला विधुर बाप्या यांची लग्न तिथल्या तिथे, काज आटोपताच आनंदोत्सव व्यक्त करून, मोठी जाणकार माणसे मध्यस्थी करुन जुळवतात. शेतीसाठी माणसं लागतात. रानावनात एकटे कसे जगायचे हा प्रश्न असतो. यासाठी ही सोपी पध्दत अवलंबिली जाते. बाईच्या पदरात अवघा एक रुपया बंदा बांधला तरी हा वाडनिश्चय साजरा होतो. अशी ही उदारता काज विधीच्या अखेरी दाखविली जाते. खडकातले पाझर येथे अनुभवता येतात. माण गमावलेल्या उध्वस्त कुटुंबाचीही पुन्हा उभारणी होते. पुन्हा आदिवासींचे नाचगाण्यांनी भरलेले जीवन सुरू होते. कष्टाळू वृत्तीला तेवढाच दिलासा.

काही नोंदी:

 विदर्भातील कोलाम लोकगीतातील एक तरुण अगदी खुल्या दिलाने आपल्या तरुण मैत्रिणीला म्हणतो - सखे तू बाजारात चल मी माझ्याजवळचे सगळे पैसे ..

४६