या तारपा नाचात, गावातला एक तरुण धिप्पाड पोऱ्या प्रमुख म्हणजे म्होरक्या असतो. त्याला ' काठ्या म्हणतात. तो डूंगराची काठी आपटत, नाचत सगळ्यांचा मार्गदर्शक बनतो. त्या पुंगराच्या काठीच्या ठेक्यात, सूर ताल धरून,सगळे एका धुंदीत नाचतात. नाचात सहभागी होणारी तरुण मुले, प्रौढ,नातीगोती विसरून परिचय असो किंवा नसो, कमरेला हातांचे आदिवासींची वाये अ) तारपाब) ढोल विळखे घालून फेर धरून ठेक्यात नाचतात.
पावली आलटून पालटून खेळतात. तारपा वाजवणारा दमदार आणि भरदार गडी असतो. तो न थकता, कंटाळता, गाल फुगवून जोमदारपणे, रात्रभर तारपा वाजवितो. आणि त्या धुंद बेहोषीत आदिवासी तहान-भूक-कष्ट-दारिद्रय सारे काही विसरून नाचतो.
ही धुंदी पाहून प्रसिध्द तत्त्ववेत्ता बान्ड रसेल याने उद्गारकाढले होते - 'माझे
सगळे ग्रंथ आणि तत्त्वज्ञान' मी तुम्हाला अर्पण करायला तयार आहे, पण फक्त हा बेहोषीचा, तुम्ही उपभोगत असलेल्या नाचातला धुंद अनुभव मला द्या. एका तत्त्व चिंतकाचे हे उद्गार आदिवासींच्या कलेचे सारे मोल करणारे आहेत. लोकसाहित्य आणि लोककला यांचे मर्म आणि मोठेपण त्यातून साकार झालेले आहे. याबद्दल यापेक्षा अधिक काहीही लिहिण्याची गरजच नाही.
काज:: 'काज' हा विधी नाचातल्या परंपरेतीलच एक आदिवासींचा एक विधी आहे. त्याचे स्वरुप श्राध्दविधीचे आहे. हल्ली आदिवासींच्या सामुदायिकविवाहाची कल्पना जशी गावोगाव मूर्त स्वरुपात आणतात. तसेच आदिवासींनी आपले परंपरेने सामुदायिक श्राध्द घालणे, मृतात्म्यांचे स्मृतिदिन साजरे करणे म्हणजे 'काज.'
या काजामध्ये मृत नातेवाईक आप्त व्यक्तींना आवाहन केले जाते. ते जणू .